bharat gogawle, uddhav thackeray Sarkarnama
कोकण

Bharat Gogavale: रायगडकडे जाणाऱ्या पायऱ्या तरी ठाकरेंना माहिती आहेत का ?

सरकारनामा ब्यूरो

Raigad News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पक्षप्रतोद आमदार भरत गोगावले यांच्यावर ठाकरे गटाच्या नेत्यांनी व उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती. या टीकेला आता आमदार भरत गोगावले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ठाकरे गटाचे अनंत गीते व आमदार भास्कर जाधव यांचाही समाचार घेतला आहे. जे मला बाटलीत बंद करायला निघाले होते, त्याला सांगतो की अजून भरत शेटला बंद करायची बाटली पैदा झाली नाही, तसेच टकमक टोकाची भाषा करणाऱ्यांना अजून टकमक टोकापर्यंत जाणाऱ्या रायगडला पायऱ्या किती आहेत हे त्यांना माहिती नाही, अशा शब्दांत गोगावले यांनी समाचार घेतला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळा कार्यक्रमात ते महाड येथे बोलत होते. या रायगडला राजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला कोण लोक येतात हे बोलणारे हे त्यांना एकदा विचारा ? छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायलाही तुमची जीभ कशी काय उचलते? आम्ही सगळे ज्या राजांच्यामुळे आज आहोत, आम्ही घडलो वाढलो त्या राजांच्या एका कार्यक्रमालाही तुम्ही येऊ शकत नाही तिथे भरत शेठला तुम्ही टकमक टोक काय दाखवत आहात ? असा खडा सवालच गोगावले यांनी उद्धव ठाकरे यांना उपस्थित केला आहे.

आमचा कोणताही कार्यक्रम श्री शिवछत्रपती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बाळासाहेबांचा नामोल्लेख केल्याशिवाय सुरू होत नाही हे आम्हाला काय सांगतात, यांच्यात हिंमत आहे का ?असे थेट आव्हानच गोगावले यांनी ठाकरे गटाला दिले.

रायगड येथील ठाकरे गटाच्या जनसंवाद कार्यक्रमात आमदार भास्कर जाधव यांनीही गोगवले यांच्यावर टीका केली होती. या टीकेलाही उत्तर देताना गोगावले म्हणाले, भास्कर जाधव परवा तत..फफ... करत होते. भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांचा एकेरी उल्लेख करत गोगावले यांनी जोरदार टीका केली. भास्कर जाधव रडत रडत मातोश्रीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घ्यायला मातोश्रीवर गेले, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी भेट दिली नाही. मातोश्रीवरून परत पाठवले हे भास्कर जाधवांना विचारा, असा आरोप आमदार गोगावले यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

साडेपाचशे कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत. महाड, गोरेगाव, पोलादपूर, माणगाव कोणत्याही तालुक्यातील विकासकाम राहिली असतील तर त्यासाठी मला विचारा 225 ग्रामपंचायती 850 गाव एक नगरपंचायत एक नगरपालिका, साडेनऊ जिल्हा परिषद गट 19 पंचायत समिती गण या सगळ्याला आम्ही सामोरे जातो. आम्ही विकास करतो, या सगळ्यामधील एकही गाव असे नाही की ते मला माहिती नाही, असंही भरत गोगावले (Bharat Gogavale) यांनी नमूद केले.

न बघता सव्वा दोनशे गावांची नावे सांगा

सहा वेळा खासदार राहिलेल्यांनी न बघता सव्वा दोनशे गावांची नावे सांगावीत, असे आव्हान गोगावले यांनी ठाकरे गटाचे रायगड लोकसभेचे उमेदवार अनंत गीते यांना दिले. ही नावं फक्त भरतशेठ सांगू शकतो, त्याचे कारण आम्ही प्रत्येक गावात पोहोचलो आहोत. आम्ही लवकरच शिवसृष्टी आणत आहोत, रायगडला पाचाड येथे माँसाहेबांच्या वाड्याजवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसृष्टी मंजूर केली आहे. लवकरच त्या कामालाही सुरुवात होणार असल्याचे गोगावले यांनी सांगितले.

(Edited by sachin Waghmare)

R

SCROLL FOR NEXT