Maharashtra Budget Session : व्हीप न पाळणाऱ्या आमदारांना शिवसेनेचे प्रतोद गोगावलेंचा सूचक इशारा

Maharashtra Budget Session Shiv Sena : ठाकरे गट अडचणीत सापडण्याची शक्यता नाकरता येत नाही.
Bharat Gogavale
Bharat GogavaleSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Budget Session : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे 9 तारखेला राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व शिवसेना आमदारांना व्हीप बजावणार आहेत.

हा व्हीप उध्दव ठाकरेंसह ठाकरे गटातील आमदारांना पाळावा लागणार का ?, व्हीप न पाळल्यास ठाकरे गटाच्या आमदारांवर कारवाई होई शकते का, असे अनेक प्रश्न सध्या विचारण्यात येत आहे. यावर शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी स्पष्टचं सांगितले आहे, त्यामुळे ठाकरे गट अडचणीत सापडण्याची शक्यता नाकरता येत नाही.

Bharat Gogavale
Shiv Sena : 'शिवसेनाभवन' ठाकरेंचे कि शिवाई ट्रस्टचे ? ; मनसेकडून कागदपत्र व्हायरल , वाचा सविस्तर..

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष, धनुष्यबाण चिन्हा शिंदे गटाकडे दिल्याने आज (सोमवारी) शिंदे गटाच्या आमदारांनी विधीमंडळातील शिवसेनेच्या कार्यालयात प्रवेश केला. त्यानंतर गोगावले बोलत होते.

"अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उपस्थितीसाठी आम्ही सर्व शिवसेनेच्या आमदारांना व्हिप बजावणार आहोत. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक आलेल्या सर्व आमदारांना हा व्हिप लागू राहणार आहेत. या व्हिपचे पालन न करणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्यात येईल," असे सांगत गोगावले यांनी ठाकरे गटातील आमदारांना इशारा दिला आहे.

उद्धव ठाकरे गटाबरोबर असलेल्या सर्व आमदारांना शिवसेना पक्षाने जारी केलेल्या व्हीपचे पालन करावे लागणार आहे अन्यथा त्यांना अपात्रतेला सामोरे जावे लागेल. असा इशारा शिवसेनेचे नेते भारत गोगावले यांनी व्यक्त केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com