Raigad News : राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आले असून सरकारला शंभरहून अधिक दिवस झाले आहेत. पण अद्यापही नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा काही सुटलेला नाही. पण आता हा गुंता सुटण्याची शक्यता असून तसेच काहीसे संकेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यांनी महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर या दोन्ही जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून कोण झेंडा फडकणार याचा फैसला घेतला आहे. राज्य सरकारकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार नाशिक जिल्ह्यात गिरीश महाजन आणि रायगड जिल्ह्यात माजी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी झेंडा फडणवला जाणार आहे. यामुळे सध्या महायुतीत मिठाचा खडा पडला आहे.
याच्याआधी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा मंत्री भरत गोगावले रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही असताना ते आदिती तटकरे यांना देण्यात आले होते. तर नाशिकमध्ये दादा भूसे ऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय गिरीश महाजन यांची नाशिकच्या पालकमंत्रीपदी नियुक्त करण्यात आली होती. यामुळे महायुतीत जोरदार वाद झाला होता. त्यावेळी मोठं नाराजी नाट्य रंगलं होतं. तर हा प्रश्न दिल्ली दरबारातही गेला होता. पण तो अद्यापही सुटलेला नाही.
दरम्यान आता महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर राज्य सरकारकडून ध्वजवंदनाबाबत परिपत्रक काढण्यात आले आले. ज्यात कोण कोणत्या जिल्ह्यात ध्वजावंदन करणार याची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्यात नाशिक आणि रायगड जिल्ह्यासाठी महाजन आणि तटकरे यांच्या नियुक्ती करण्यात आली आहे. यावरून आता नाराजी नाट्य समोर आले आहे.
या नियुक्तीवरून शिवसेना नेते भरत गोगावलेंनी प्रतिक्रिया देताना, असं कसं पालकमंत्रिपद दिलं जाईल. 'मी ही रायगडचा मावळा आहे', असं म्हणत विरोध केला आहे. तर “झेंडावंदन करण्याचा अधिकार दिला म्हणजे पालकमंत्री दिले असं होत नाही, असा ही टोला लगावत आपण तलवार म्यान केलेली नसल्याचे संकेतही गोगावले यांनी दिले आहे.
तसेच आदिती तटकरे यांना जिल्ह्याच्या पातळीवर झेंडावंदन करण्याचा अधिकार आहे. तसाच आम्हालाही तालुक्याच्या ठिकाणी ध्वजावंदन करण्याचा देण्यात आला आहे. आम्ही तो पार पाडणार आहोत. पण आता माहिती मिळतेय ठीक आहे. झेंडावंदन करण्याचा अधिकार दिला म्हणजे पालकमंत्री दिले असं होत नाही. मागच्या वेळी अशाच पद्धतीने 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टलाही नियुक्ती करण्यात आली होती. म्हणून कदाचित आताही जबाबदारी दिली असावी.
तर आपल्याला पालकमंत्रिपद मिळणार असा ठाम विश्वासही गोगावले यांनी यावेळी व्यक्त केला असून काही गोष्टी वाटत असतात असं समजूनच वाटचाल करायची असते. सब्र का फल मिठा होता है असेही त्यांनी म्हटलं आहे. तसेच महायुतीत शिवसेना बॅकफूटवर जात असल्याच्या शक्यतेवर उत्तर देताना, गेल्या वेळी पालकमंत्रिपद दिल्यानेच आता महाजन आणि तटकरे यांना ध्वजावंदन करण्याचा मान देण्यात आल्याचं दावा गोगावले यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.