Bharat Gogawale : एकनाथ शिंदेंचा एकच फोन अन् गोगावले तातडीनं मुंबईला रवाना, घडामोडींना वेग

Eknath Shinde Dials Bharat Gogawale for Emergency Mumbai Meet : अमित शाह यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर लगेचच आता आता भरत गोगावले यांना एकनाथ शिंदे यांनी फोन करुन तातडीने मुंबईला बोलावून घेतलं आहे.
Eknath Shinde Dials Bharat Gogawale for Emergency Mumbai Meet
Eknath Shinde, Bharat GogawaleSarkarnama
Published on
Updated on

Raigad Guardian Minister Post : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे काल रायगड दौऱ्यावर होते. त्यांच्या या दौऱ्यात रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद मिटेल अशी अपेक्षा होती, मात्र त्यासंदर्भात कोणताही निर्णय झाला नाही. दरम्यान रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिंदे गट आग्रही आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री अमित शहा यांची एकट्यात भेट घेतली त्यात यासंदर्भात त्याच्यांत बोलणं झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.

अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आज रविवार बंद दाराआड चर्चा झाली. सुमारे अर्धा तास ही चर्चा चालल्याचे सांगितले जात आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित नव्हते. अजित पवार बारामतीत होते तर देवेंद्र फडणवीस नागपूरकडे रवाना झाले होते. त्यामुळे फक्त एकनाथ शिंदे व अमित शाह यांच्यातच ही चर्चा झाली.

Eknath Shinde Dials Bharat Gogawale for Emergency Mumbai Meet
Chhagan Bhujbal : अजित पवारांवर नाराज असलेल्या भुजबळांकडून शरद पवारांना खास भेट, स्वगृही परतणार?

दरम्यान अमित शाह यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर लगेचच आता आता भरत गोगावले यांना एकनाथ शिंदे यांनी फोन करुन तातडीने मुंबईला बोलावून घेतलं आहे. भरत गोगावले यांना मुंबईला येण्याचे आदेश शिंदेंनी दिली आहेत. एक कार्यक्रम अर्धवट सोडूनच भरत गोगावले हे थेट मुंबईच्या दिशेने रवाना झाले. रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी भरत गोगावले हे आग्रही आहेत.

काल, रायगड दौऱ्यात अमित शहा हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार सुनिल तटकरे यांच्या निवासस्थानी देखील जेवणासाठी गेले होते. सुनिल तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे याही पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत. भरत गोगावले यांना तटकरे यांच्या घरी जेवणाचे निमंत्रण असताना देखील ते अनुपस्थित होते. ज्यावेळी राज्यातील इतर जिल्हांच्या पालकमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाली, त्यावेळी रायगडचे पालकमंत्रिपद हे आदिती तटकरे आणि नाशिकचे पालकमंत्रिपद गिरीश महाजन यांना देण्यात आले होते. पण शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतल्याने दोनही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद रद्द करण्याची नामुष्की महायुती सरकारवर आली.

Eknath Shinde Dials Bharat Gogawale for Emergency Mumbai Meet
Sandipan Bhumre On Khaire-Danve : अंबादास दानवे कागदोपत्री नेते, तर खैरेंनी आता नातवंड सांभाळावीत! खासदार भुमरेंचा टोला

त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन एकनाथ शिंदेंची शिवसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठा संघर्ष असून त्यापार्श्वभूमीवर घडामोडींना आता वेग आला आहे. भरत गोगावले तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत. शिंदेंनी गोगावलेंना तातडीने मुंबईला बोलावून घेतलं आहे. गोगावले म्हणाले, पक्षाच्या कामासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावले आहे. पक्षाच्या काही गोष्टी असतात, शेवटी पक्षबांधणी आणि पक्ष वाढवणे महत्वाचे आहे आणि जी काही जबाबदारी आमच्यावर दिली आहे ती आम्हाला पार पाडायची आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com