Sunil Tatkare Bharat Gogawale Sarkarnama
कोकण

'माझ्या पराभवसाठी महायुतीच्याच काही लोकांनी देव पाण्यात ठेवले', गोगावलेंनी पुन्हा एकदा तटकरेंना डिवचले

Bharat Gogawale On Sunil Tatkare : रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अद्याप सुटला नसतानाच रायगडमधील शासकीय ध्वजारोहणाचा मान मंत्री आदिती तटकरे यांना पुन्हा देण्यात आला आहे. यावरून भरत गोगावले यांनी आधीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Aslam Shanedivan

Summary :

  1. भरत गोगावले यांनी पराभवासाठी महायुतीतील काही लोकांनी कारस्थान रचल्याचा आरोप केला.

  2. त्यांनी सुनील तटकरे यांचे नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली.

  3. माय-बाप मतदारांच्या आशीर्वादामुळे विजय मिळाल्याचे आणि मंत्री झाल्याचे त्यांनी सांगितले.

Raigad News : राज्यात महायुतीचे सरकार येवून 8 महिने होत आले असून अद्याप रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा काही सुटलेला नाही. दरम्यान दोन्ही जिल्ह्यात होणाऱ्या 15 ऑगस्टला शासकीय ध्वजारोहणाचा मान रायगडसाठी मंत्री आदिती तटकरे यांना देण्यात आला आहे. त्यामुळे एकार्थी पालकमंत्रिपदाच्या शर्यतीत तटकरेच काहीशा वरचढ ठरल्या आहेत. दरम्यान यावरून शिवसेना मंत्री भरत गोगावले यांनी आक्रमक भूमिका घेतली असून त्यांनी खासदार सुनील तटकरे यांचे नाव न घेता जोरदार टीका केली आहे. त्यामुळे पालकमंत्रिपदाचा वाद नव्याने उफळला आल्याचे दिसत आहे. गोगावले यांनी, माझ्या पराभवसाठी महायुतीच्याच काही लोकांनी देव पाण्यात ठेवले होते, पण माय-बाप मतदारांच्या आशीर्वादाने मी निवडणूक जिंकलोच नाही तर आता मंत्रीही झाल्याचे म्हटलं आहे.

रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा वाद सुरू असतानाच यंदा पुन्हा रायगड जिल्ह्यासाठी स्वातंत्र्यदिनामित्त ध्वजारोहणाचा मान मंत्री आदिती तटकरे यांना देण्यात आला. यामुळे गोगावले यांनी रायगडमधील माणगाव येथे शिवसेनेचा महाविजय निर्धार मेळाव्यात आणि त्यानंतर पत्रकारांशी चर्चा करताना जोरदार टीका केली. त्यांनी, खासदार सुनिल तटकरे यांच्यावर हल्लाबोल करताना, मी निवडून येऊ नये म्हणून महाविकास आघाडीतील नेत्यांनी देव पाण्यात ठेवले होते. त्यांचे ठिक आहे. पण हा गोगावले निवडून येऊ नये म्हणून महायुतीच्या काही नेत्यांनीही देव पाण्यात ठेवले होते.

मात्र जनतेच्या आशीर्वादानं मी 26 हजार 200 मतांनी निवडून आलो. फक्त निवडूण आलो नाही तर आता मंत्रीही झालो. आम्ही गोरगंरीबाचे शेठ आहोत. आम्ही शासनाला लुटणारे नाहीत. आणि राहिली गोष्ट पालकमंत्रीपदाची तर पालकमंत्रीपद किस बात की चीज है... ''ज्या मावळ्यांनी अडीच वर्षासाठी मंत्रिपद सोडले त्याला पालकमंत्री किस बात की चीज है, असेही गोगावले म्हणाले.

शिंदेंनी कधीही कोणत्याही प्रकल्पाला आईचं नाव दिलेलं नाही. मात्र तटकरेंनी, मी 10 कोटी देतो पण माझ्या आईचं नाव द्या, अशी मागणी केल्याचा दावा केला. तर तटकरे यांनी गोगावले यांची हातात रुमाल घेत केलेल्या नक्कलेची खिल्ली उडवताना, काही लोकांनी आमच्या रूमालाची टिंगल केली. पण आम्ही शून्यातून इकडे आलेलो आहोत, असा टोलाही तटकरेंनी लगावला. महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांचे वजन कमी होताना दिसत आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना गोगावले यांनी अजिबात नाही असे म्हटले असून शिंदेंचे वजन कमी पडले असते तर आम्ही उठाव केलेल्या पालकमंत्री पदावर स्टे आला नसता, असेही म्हटले आहे.

भरतशेठच रायगडचे पालकमंत्री : महेंद्र थोरवे

आता रायगडच्या झेंडा वंदनासाठी कोणाचं नाव जाहीर होतं हे महत्वाचं नाही. भरतशेठच रायगडचे पालकमंत्री असतील असा दावा आमदार महेंद्र थोरवे यांनी केला. त्यांनी सुनील तटकरे यांना निशाना करताना, तटकरेंनी आतापर्यंत जे काही केलं ते सगळ जगजाहीर आहे. माझ्या मतदारसंघात देखील त्यांनीच उमेदवार उभा केला आणि त्याला आर्थिक पाठबळ दिले. तटकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले, आता आमची वेळ आहे, असे म्हणत थोरवेंनी तटकरेंना इशारा दिला आहे.

FAQs :

प्र.१: भरत गोगावले यांनी कोणावर टीका केली?
उ: त्यांनी सुनील तटकरे यांचे नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली.

प्र.२: वाद कशामुळे पेटला?
उ: पालकमंत्रिपदाच्या वादामुळे राजकीय ताप निर्माण झाला.

प्र.३: भरत गोगावले यांनी काय दावा केला?
उ: त्यांच्या पराभवासाठी महायुतीतीलच काही लोकांनी कट रचला होता असा दावा त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT