रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महेश गणवे यांनी उद्धव ठाकरे गट सोडून शिंदे गटात प्रवेश केला.
महेश गणवे हे शिवसेना मुंबई विभाग संपर्क प्रमुख तसेच समाजसेवक म्हणून ओळखले जातात.
त्यांच्या प्रवेशामुळे मंडणगडमधील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे.
Mandangad : सचिन माळी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी कोकणात राजकीय ताणतणाव चांगलाच वाढला असून भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना आमने-सामने आली आहे. येथे एकमेकावर उट्टे काढण्याची एकही संधी दोन्ही पक्षाचे नेते सोडताना दिसत नाहीत. तसेच आपल्या पक्षाच्या मजबूती करणासह महाविकास आघाडीतील आणि प्रामुख्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात कोणत्या घडामोडी सुरू आहेत. कोणता नेता फोडता येतो याकडे बारकाईने भाजपसह शिवसेनेचे लक्ष असते. असेच लक्ष ठेवून जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील शिवसेनेनं मोठा मासा गळला लावला आहे. ज्यामुळे आता आगामी स्थानिकच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राजकीय समीकरणांचा ताणतणाव चांगलाच वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा झटका देत शिवसेना मुंबई विभाग संपर्क प्रमुख व समाजसेवक महेश गणवे यांना शिंदेंच्या शिवसेनेनं आपल्या पक्षात खेचले आहे. त्यांनी शनिवारी शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
हा पक्षप्रवेश गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या मंडणगड तालुक्यातील सोवेली येथील निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात झाला. यावेळी शिवसेना नेते रामदास कदम, गृहराज्य मंत्री योगेश कदम, तसेच गणवे यांचे निकटतम सहकारी उद्योजक दीपक घोसाळकर, अवधूत घोसाळकर, बिलाल म्हाळुंगकर, संदेश चिले यांसह कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
तालुक्यात सध्या आघाडी युतीच्या हालचालींना वेग आला असतानाच हा प्रवेश झाला आहे. विशेष म्हणजे, काही तास आधीच उबाठा, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि आय काँग्रेस या तीन पक्षांची एकत्रीत बैठक मंडणगड शहरात पार पडली होती. त्या बैठकीत शिवसेना भाजप महायुतीविरोधात एकत्र येण्याची रणनीती आखली गेली होती. मात्र, याच पार्श्वभूमीवर उबाठा गटातील एक मजबूत शिलेदार असलेले महेश गणवे यांनी शिंदे गटात प्रवेश करून संपूर्ण समीकरणे उलथवण्याची शक्यता निर्माण केली आहे.
त्यामुळे तालुक्यातील निवडणूक राजकारणात नव्या घडामोडींचा तडाखा बसणार, असे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. गणवे यांच्या प्रवेशाने उबाठा गटात अस्वस्थता निर्माण झाली असून, यामुळे निवडणुकीचे वारे कोणत्या दिशेने वाहणार, याची झलक या प्रवेशातून स्पष्ट झाल्याचे मानले जाते.
दीपक तेंडुलकर यांचा राजीनामा
दरम्यान ठाकरेंना रायगड जिल्ह्यातील रोहा अष्टमी येथेही दुसरा झटका बसला असून शहरप्रमुख दीपक तेंडुलकर यांनी आपल्या शहर प्रमुखपदासहित शिवसेना सदस्यत्वपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी कोणत्याही नेत्यांवर आरोप न करता जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्याकडे राजीनामा दिला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.