Kolhapur News, 08 Nov : 'कोल्हापूरमधील पदाधिकार्यांमध्ये विसंवाद दिसून आलेला आहे. निवडणूक आणि पक्ष बांधणीच्या अनुषंगाने मतभेद आहेत. विसंवाद मिटवण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ. वरिष्ठ नेत्यांकडून कोल्हापुरातील मतभेदांना खतपाणी नाही. त्यावर नुकत्याच मुंबई येथे झालेल्या भेटीमध्ये कोल्हापूर पदाधिकाऱ्यांना एकीचे महत्व पटवून दिले आहे.
पदाधिकाऱ्यांमध्ये मनोमिलन झालेलं आहे', असा दावा कोल्हापुरातील ठाकरेंच्या शिवेसेनेचे प्रभारी आणि आमदार सुनील प्रभू यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कृपेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकाऱ्यांची आणि इच्छुक उमेदवारांची आढावा बैठक पार पडली.
माजी खासदार विनायक राऊत, सुनील प्रभू ,अरुण भाई दूधवाडकर, नितीन बानगुडे पाटील यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. खासदार, आमदार नसतानाही नगरपालिकांमध्ये पक्षाच्या वतीने मशाल चिन्ह घेऊन निवडणूक लढवायला शेकडोच्या संख्येने इच्छुक आहेत. आमचे उमेदवार तयार आहेत सर्वांमध्ये आत्मविश्वास आहे. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व त्यांची लोकप्रियता आणि पदाधिकाऱ्यांची कार्यक्षमता विचारात घेऊन हे निवडणुका लढवत आहोत.
आघाडीच्या वतीने निवडणुका झाल्या तर अधिक चांगलं होईल असंही मत काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं. काँग्रेसकडूनही आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. असा विश्वास विनायक राऊत यांनी व्यक्त केला. गेल्या वेळेस लोकसभेत काँग्रेसच्या उमेदवाराला आमच्या पक्षाने पाठिंबा दिला तसंच विधानसभेसह बहुतेक निवडणुकांमध्ये आपण पाठिंबा दिला. जे काम दिलं ते आम्ही शिवसेना म्हणून प्रामाणिकपणे केलं.
या निवडणुकांमध्ये काँग्रेसने अधिक मदत करावी अशी भावना कार्यकर्त्यांनी मांडल्याचं राऊत म्हणाले. कोल्हापूरमध्ये आजही शिवसेनेचे चार नगरसेवक आहेत. महापालिकेच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेले नाहीत. आमचा हा मेळावा नगरपालिका आणि नगरपंचायतसाठी आहे. उद्धव ठाकरे यांचे सर्व कार्यकर्ते मशाल टीम म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत उतरतील असंही राऊत म्हणाले.
तर पार्थ पवार यांच्या प्रकरणावर बोलताना राऊतांनी, देवाभाऊच्या महाराष्ट्रातले राजकारण लुटारुचं झालं आहे. पैशाचा व्यवहार करणं. भ्रष्टाचार करणे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या ठेकेदारांना पैसे न देणे, अशा लुटारूंचा महाराष्ट्र भाजप आणि गद्दार गटाने तयार केला आहे. कालचा पुण्यातील प्रकार हा अत्यंत भयानक आहे. हा घोटाळा अजित पवार यांच्या घरामध्ये होतंय हे राज्यकर्ते कशाच संरक्षण करतात असा प्रश्न उपस्थित होतो.
या घोटाळ्यामध्ये अधिकाऱ्यांना बळी द्यायचं आणि घोटाळा केला त्यांच्यावर त्यांच्यावर कारवाई करायची नाही. देवाभाऊ यांचा राम शास्त्री बाणा आता दिसतोय का? असा आमचा प्रश्न आहे. कालचा महाघोटाळा हा सत्तेतल्या पक्षानेच काढला आहे. घोटाळे बाहेर आले की चौकशी समिती नियुक्त करायचं काम देवाभाऊ करतात.
लवकर सरकारचं विसर्जन होऊ अशी आमची प्रार्थना आहे. एकनाथ खडसेंना वाळीत टाकून कारवाई केली जाते. तर अजित पवारांचा सुपुत्र एवढा महाघोटाळा करू शकतो त्यांच्यावर कोणतेही कारवाई होत नाही. अजित पवारांनी या घोटाळ्याची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे आणि चौकशीला समोर गेले पाहिजे. अशी मागणी राऊतांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.