Panchayat Samiti election results; uddhav thackeray, Eknath Shinde And devendra fadnavis sarkarnama
कोकण

panchayat samiti elections : भाजप-शिवसेनेला लॉटरी! मतदान, निकालाच्या आधीच 'ZP' त गुलाल उधळला, राज्यात पंचायत समितीत पहिलाच विजय

Panchayat Samiti election results : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजप महायुतीच्या जागा वाटपावरून कोकणात वाद उफाळला असतानाच तळकोकणासह कोकणात मतदानाच्या आधीच गुलाल उधळला आहे.

Aslam Shanedivan

  1. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात भाजप आणि शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांचा काही पंचायत समिती गणांमध्ये बिनविरोध विजय झाला आहे.

  2. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीत अर्ज अवैध ठरल्याने ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

  3. ५ फेब्रुवारीला होणाऱ्या मतदानापूर्वीच कोकणातील राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत.

Ratnagiri/ Sindhudurg News : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूका जाहीर झाल्या असून अर्ज भरण्याची मुदत देखील संपली आहे. आता माघारीच्या दिवसाकडे अनेकांच्या नजरा असून मतदान ५ फेब्रुवारीला होणार आहे. पण त्याआधीच तळकोकणासह कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात भाजपसह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला गुलाल लागला आहे. येथील पंचायत समिती गणात भाजपसह शिवसेनेच्या उमेदवाराची बिनविरोध झाले आहेत. दरम्यान रत्नागिरीत कोणत्याच पक्षाने अर्ज दाखल न केल्याने शिंदेंच्या शिवसेनेचा विजय झाला. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीत पंचायत समिती गणात अर्ज अवैध ठरल्याने ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसला आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूका जाहीर होताच जागावाटपावरून महायुतीत वाद सुरू झाला आहे. येथे आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगत भाजप कार्यकर्त्यांचा संयम सुटला असून भाजपला फक्त दोन जागा सोडत बोळवण केल्याचा राग व्यक्त करण्यात येत आहे. यावर भाजप कार्यकर्त्यांनी बैठकीत बंडाचे निशाण फडकवले असून भाजपच्या बैठक कुठे हमरीतुमरी झाली आहे. तर कुठे भाजपमधील पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत आपल्या संतापासह नाराजीला वाट करून दिली आहे. यामुळे स्थानिक नेत्यांची चांगलीच कोंडी झाल्याचे समोर येत आहे.

रत्नागिरीत बंडखोरांमुळे महायुतीची डोकेदुखी वाढली असनाच नाणीज पंचायत समिती गणात भाजपचा विजय झाला आहे. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी स्थानिक स्तरावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार यांनी एकत्रितपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेत आणि काँग्रेसमध्ये अद्याप आघाडीबाबत काहीच ठरलेलं नाही. यामुळे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेच्या डॉ. पद्मजा कांबळे यांच्या विरोधात अर्जच दाखल झाला नाही. ज्यामुळे त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. दरम्यान आता २७ जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असून यादिवशी लढतींचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

नाणीज पंचायत समिती गणातून शिवसेनेच्या डॉ. पद्मजा कांबळे यांच्या रूपात शिवसेनेच्या विजयाचा पहिला गुलाल नाणीजमध्ये उधळला गेला आहे. तसेच मतदानापूर्वीच पंचायत समितीमध्ये पहिली जागा शिवसेनेने आपल्या नावावर केली आहे. सध्या जिल्ह्यात शिवसेना आणि भाजप यांच्यात कलगितुरा रंगला असतानाच डॉ. कांबळे यांना मिळालेलं यश हे शिवसेनेसाठी बळ देणारे आहे.

ठाकरे शिवसेनेला धक्का...

कणकवली पंचायत समिती निवडणुकीत ठाकरे शिवसेनेला जोरदार धक्का बसला असून बिडवाडी पंचायत समिती मतदार संघातील ठाकरे गटाच्या उमेदवार विद्या शिंदे यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे. यामुळे भाजपच्या उमेदवार संजना राणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. विद्या शिंदे यांना तीन अपत्य असल्याबाबत संजना राणे यांच्यावतीने ॲड.उमेश सावंत यांनी हरकत घेतली होती. ज्यानंतर कागदपत्रांच्या पडताळणीअंती त्या अपात्र ठरल्या. संजना राणे यांच्या बिनविरोध विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष केला.

FAQs :

1) पंचायत समिती निवडणुकीचे मतदान कधी होणार आहे?
👉 मतदान ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

2) कोकणात कोणत्या पक्षाला बिनविरोध विजय मिळाला?
👉 रत्नागिरी जिल्ह्यात भाजप आणि शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांना बिनविरोध विजय मिळाला.

3) सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणत्या पक्षाला धक्का बसला?
👉 सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठाकरे शिवसेनेला धक्का बसला आहे.

4) बिनविरोध निवड म्हणजे काय?
👉 कोणत्याही प्रतिस्पर्धी उमेदवाराचा अर्ज नसल्यास उमेदवार बिनविरोध निवडला जातो.

5) या निकालाचा राजकारणावर काय परिणाम होईल?
👉 कोकणात भाजप-शिंदे शिवसेनेची ताकद वाढेल आणि इतर पक्षांच्या रणनीती बदलण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT