Shivsena-BJP News : परभणी जिल्हा परिषद निवडणुकीत नावापुरतीच युती, गंगाखेडमध्ये भाजप स्वबळावर लढणार

BJP Shiv Sena alliance Parbhani : परभणी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप-शिवसेना युती केवळ दोन मतदारसंघापुरती मर्यादित असून गंगाखेडमध्ये भाजप स्वबळावर लढत देत आहे, त्यामुळे जिल्ह्यात नवी राजकीय समीकरणे तयार होत आहेत.
BJP and Shiv Sena district leaders addressing a joint press conference in Parbhani while announcing limited alliance strategy for Zilla Parishad elections.
BJP and Shiv Sena district leaders addressing a joint press conference in Parbhani while announcing limited alliance strategy for Zilla Parishad elections.Sarkarnama
Published on
Updated on

Parbhani ZP Election News : महापालिका निवडणुकीत युती तुटल्यानंतर शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांना फटका बसला. महाविकास आघाडीने सत्ता काबीज केली. या पराभवातून धडा घेत शिवसेना-भाजप नेत्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत युतीचा निर्णय घेतला खरा, पण तो फक्त दोन विधानसभा मतदारसंघातील गटांपुरती.

गंगाखेड विधानसभा मतदारसंघात मात्र भाजपने पुन्हा स्वबळाचाच नारा दिला. तर पाथरी विधानसभा मतदारसंघाबाबतचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भूमरे व शिवसेना जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या एकूण 54 गटांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजप - शिवसेनेची युती होणार की नाही? याबाबत मोठी उत्सुकता असताना अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली. भाजप जिल्हा परिषदेच्या 47 गटात आणि पंचायत समितीच्या 101 गणांवर निवडणूक लढवणार आहे.

BJP and Shiv Sena district leaders addressing a joint press conference in Parbhani while announcing limited alliance strategy for Zilla Parishad elections.
Parbhani Mayor News: ठाकरेंनी जिंकलेल्या एकमेव परभणी महापालिकेत महापौर कोण होणार? 'या' नेतेमंडळींची नावं सर्वाधिक चर्चेत

परभणी विधानसभा मतदारसंघातील चारपैकी दोन जागा भाजपला तर दोन जागा शिवसेनेला देण्यात आल्या आहेत. परभणी महापालिकेत विरोधकांकडून झालेल्या पराभवाची परतफेड जिल्हा परिषद निवडणुकीत केली जाईल, असा इशाराही जिल्हाध्यक्ष भुमरे यांनी यावेळी दिला. केंद्र व राज्य सरकारच्या योजना ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या असून त्याचा सकारात्मक परिणाम निवडणूक निकालातून दिसून येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com