Shivsena BJP News: सिल्लोडनंतर फुलंब्रीतही शिवसेना भाजप युती तुटली; दोन्ही पक्षांनी वाटले एबी फॉर्म

Chhatrapati SambhajiNagar politics : सिल्लोडनंतर फुलंब्रीतही शिवसेना–भाजप युती तुटली. दोन्ही पक्षांनी स्वतंत्र उमेदवार देत एबी फॉर्म वाटले, तर उबाठा–काँग्रेस आघाडीमुळे जिल्हा परिषद निवडणूक अधिक चुरशीची झाली.
Atul Save, Sanjay Shirsat
BJP and Shiv Sena candidates submitting nomination forms with party workers during the final day of ZP elections in Phulambri after the alliance split.Sarkarnama
Published on
Updated on

Phulmari ZP election news : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेसाठी सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील 11 गट वगळून 63 पैकी 52 जागांवर शिवसेना-भाजप युतीची घोषणा काल मंत्री अतुल सावे शिवसेनेचे खासदार संदिपान भुमरे, पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी केली होती. फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील पाच पैकी चार गट भाजपाच्या वाट्याला तर एकमेव गट शिवसेनेकडे होता. तरीही भाजप इच्छुकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती. तर शिवसेनेच्या वाट्याला वडोद बाजारची एकमेव जागा सोडण्यात आल्यामुळे या पक्षातही इच्छुक बंडखोरीच्या पावित्र्यात होते

दोन्ही पक्षातील ही नाराजी आणि इच्छुकांचा आक्रमक पवित्र पाहता ऐनवेळी दोन्ही पक्षांनी पाचही गटातून स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेना भाजपच्या स्थानिक नेत्यांनी या उमेदवारांना एबी फॉर्म देत फुलंब्रीतही युती तोडल्याचे दिसून आले आहे. शिवसेनेचे प्रभारी जिल्हाप्रमुख रमेश पवार यांनी खासदार संदिपान भुमरे यांच्या सांगण्यावरून फुलंब्री मध्ये युती तोडल्याचा आरोप केला जात आहे. या घडामोडीनंतर संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड आणि फुलंब्री या दोन मतदारसंघातही युतीचे बारा वाजल्याचे चित्र आहे.

एकीकडे शिवसेना भाजप या दोन पक्षांची जाहीर झालेली युती उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तुटली तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काँग्रेस यांची मात्र आघाडी झाली. सुरुवातीला युतीनुसार जागावाटप व उमेदवारी निश्चित करण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र अंतिम टप्प्यात समन्वयाचा अभाव, अंतर्गत नाराजी आणि शक्ती प्रदर्शनामुळे भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहे.

बुधवारी (ता.21) भाजपच्या उमेदवारांनी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून भाजपने आपल्या सर्व उमेदवारांना ऐनवेळी थेट बी-फॉर्म दिले. त्याचवेळी शिवसेनेनेही जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांमध्ये आपापले उमेदवारी अर्ज स्वतंत्रपणे दाखल करत युतीपासून फारकत घेतल्याचे स्पष्ट संकेत दिले.

या घडामोडींमध्ये काँग्रेस पक्षालाही अडचणींचा सामना करावा लागला. दुपारी अडीच वाजेपर्यंत काँग्रेसच्या उमेदवारांना पक्षाचे अधिकृत बी-फॉर्म मिळाले नव्हते. अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवार व कार्यकर्ते तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर बी-फॉर्मच्या प्रतीक्षेत थांबले होते. अखेर अंतिम वीस मिनिटांत काँग्रेसकडून बी-फॉर्म वितरित करण्यात आले.

तर भाजप आणि शिवसेनेच्या काही उमेदवारांना शेवटच्या क्षणी बी फॉर्म देण्यात आले. मात्र बाबरा व पाल गटातील उमेदवारांना बी-फॉर्म नाकारण्यात आल्याने मोठा गदारोळ झाला. दरम्यान, फुलंब्री तालुक्यात काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) यांची आघाडी झाल्याचेही स्पष्ट झाले.

Atul Save, Sanjay Shirsat
Shivsena UBT : अंबादास दानवेंनी महिन्याभरापूर्वी टाकलेला डाव भाजपला आता लक्षात येतोय... सावे-कराड जोडी 'मामू' बनणार?

या आघाडीमुळे निवडणुकीतील लढत अधिक चुरशीची होणार आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांना पूरक उमेदवारी देत थेट सामना महायुतीच्या घटक पक्षांशी करण्याची रणनीती आखल्याची चर्चा आहे. एकूणच उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी युतीचे गणित बिघडल्याने फुलंब्री तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अधिकच रंगतदार झाली आहे. बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे मतदारांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

Atul Save, Sanjay Shirsat
Shivsena UBT News : उद्धव ठाकरेंनी जिल्हाप्रमुख केलेला नेता अब्दुल सत्तारांनी 24 तासांत फोडला; मुलगी ZP च्या मैदानात

शक्ती प्रदर्शनामुळे तहसीलचे गेट बंद

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी विविध पक्षांच्या शक्ती प्रदर्शनामुळे तहसील कार्यालय परिसरात तणावपूर्ण वातावरण होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोलीस निरीक्षक संजय सहाने, पोलीस उपनिरीक्षक चाटे यांच्यासह पोलिसांचा ताफा तैनात होता. सुरक्षेच्या कारणास्तव तहसीलचे मुख्य प्रवेशद्वार बंद केल्याने केवळ उमेदवार व त्यांचे सुचक यांनाच आत प्रवेश देण्यात येत होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com