local Body Elections Nilesh Rane, Deepak Kesarkar And Nitesh Rane sarkarnama
कोकण

Sindhudurg News : सिंधुदुर्गमध्ये महायुतीच्या चर्चांना पूर्णविराम? राणे विरुद्ध राणे वादाचा दुसरा पार्ट जिल्हा परिषेदत दिसणार!

Deepak Kesarkar and Nilesh Rane : कोकण किनारपट्टीवर कधीकाळी ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रभाव होता. पण नुकताच पार पडलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचा भाजप आणि शिवसेनेच्या वादळासमोर पालापाचोळा झाला आहे.

शिवप्रसाद देसाई

  1. राज्यातील पहिल्या टप्प्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

  2. कोकणात 77 पैकी 41 नगरसेवक भाजपकडे गेले असून शिंदे गटाच्या शिवसेनेला अपेक्षित यश मिळाले नाही.

  3. दीपक केसरकर आणि निलेश राणे हे दोन आमदार असतानाही आगामी जिल्हा परिषदेत महायुतीची गणिते बिघडण्याची शक्यता आहे.

- शिवप्रसाद देसाई

Sindhudurg News : नगरपालिका निवडणूक निकालात राज्याप्रमाणेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. चारपैकी 2 नगराध्यक्षपद मिळाली असली तरी नगरसेवक संख्येमध्ये भाजप सरस ठरला आहे. 77 नगरसेवकांपैकी तब्बल 41 पदे भाजपकडे गेली आहेत. त्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात दाखवलेल्या या ताकदीने आगामी काळात महायुतीची गणिते बिघडण्याची शक्यता आहे.

राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत महायुतीची चर्चा सुरू होती तेव्हा कोकणात वादाची ठिणगी पडली होती. पक्ष फोडाफोडी, पदाधिकारी पळवापळवीमुळे भाजप-शिवसेनेत तुटेपर्यंत फाटले आणि दोन्ही पक्ष आमने-सामने आले. त्यानंतरही कार्यकर्ते आणि माजी मंत्री दीपक केसरकर आणि निलेश राणे यांनी महायुती म्हणून रिंगणात उतरण्याची मागणी केली होती. त्याबाबत त्यांनी वरच्या पातळीवर जोर लावला होता.

मात्र पालकमंत्री नितेश राणे यांनी त्याला स्पष्ट नकार देत स्वबळाचा नारा दिला. यासाठी पक्षातील वरिष्ठांनी कौल दिल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे दोन्ही प्रमुख पक्ष स्वतंत्र निवडणुकीत उतरले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाश शिंदे यांची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली होती.

एकीकडे शिवसेना महायुतीसाठी आग्रही असतानाही भाजपने आगामी निवडणुकांसाठीची 'लिटमस टेस्ट' समजून एकटे पुढे जाण्याचा मार्ग अवलंबला. भाजपची ही टेस्ट सध्या तरी यशस्वी झाली आहे. महायुती न झाल्याने महाविकास आघाडीचा प्रभावही फारसा राहिला नाही. महायुती झाली असती तर सत्ताधार्‍यांविरोधातील मते महाविकास आघाडीकडे गेली असती. शिवाय उमेदवारी न मिळालेले नाराज या पक्षाकडे जाण्याची शक्यता होती.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात चार पैकी दोनच नगराध्यक्षपदे भाजपला मिळाली असली तरी संख्यात्मक पातळीवर त्यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. जिल्ह्यात एकूण 77 नगरसेवक पदांसाठी लढत झाली. यातील भाजपकडे तब्बल 41, शिवसेनेकडे 18, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व शहर विकास आघाडीकडे प्रत्येकी 8 तर अपक्ष आणि काँग्रेस यांच्याकडे प्रत्येकी 1 नगरसेवक पद गेले आहे.

महायुतीच न झाल्याने पहिल्या आणि दुसर्‍या क्रमांकाची बरीचशी मते शिवसेना आणि भाजप यांच्या भोवतीच खेळती राहिली. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या बहुसंख्य मतदारसंघामध्ये महायुतीतील दोन्ही पक्षांकडे दिग्गज इच्छुक आहेत. त्यातही भाजपमध्ये वजनदार इच्छुकांची संख्या जास्त आहे.

या लढतीत महायुती झाली तर तिकीट न मिळालेले नाराज ठाकरे शिवसेना किंवा महाविकासच्या अन्य घटक पक्षांकडे वळण्याची शक्यता असणार आहे. या सगळ्या परिस्थितीचा विचार करता आगामी निवडणुकीत महायुतीची शक्यता फार कमी आहे. शिवाय 2029 मध्ये विधानसभेसाठी भाजपने स्वबळाचा नारा दिला आहे. अशावेळी संघटनात्मक बळ राखण्यासाठी त्यांच्याकडून महायुतीला फारसे प्राधान्य दिले जाण्याची शक्यता कमी आहे.

FAQs :

1. पहिल्या टप्प्यातील स्थानिक निवडणुकांत कोणता पक्ष आघाडीवर आहे?
भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

2. शिंदे शिवसेना आणि अजित पवार गटाची कामगिरी कशी राहिली?
शिंदे शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर तर अजित पवारांची राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकावर आहे.

3. कोकणात भाजपला किती नगरसेवक पदे मिळाली?
77 पैकी 41 नगरसेवक पदे भाजपने जिंकली आहेत.

4. महाविकास आघाडीची स्थिती काय आहे?
महाविकास आघाडीला या निवडणुकांत मोठा फटका बसला आहे.

5. या निकालांचा जिल्हा परिषद निवडणुकांवर काय परिणाम होऊ शकतो?
भाजपचा वाढलेला दबदबा पाहता महायुतीतील अंतर्गत समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT