Mahayuti municipal elections: शेकडो नेते आयात करूनही नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपची दमछाक : महापालिका, ZP साठी प्लॅन बदलणार?

Political News : आगामी काळात होत असलेल्या महापालिका त्यासोबतच झेडपी व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी बदलली आहे. त्यासाठीच आता भाजपने जुळवून घेत महायुतीत एकत्रित लढण्याचे प्लॅनिंग सुरु केले आहे.
Eknath shinde, Ajit Pawar & devendra Fadanvis
Eknath shinde, Ajit Pawar & devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीवर महायुतीचे वर्चस्व दिसत असले तरी या निवडणुकीत त्यांना घवघवीत यश मिळवता आले नाही. भाजपचे स्वबळावर १५० पेक्षा अधिक ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष निवडून येतील असा अंदाज होता. तशास्वरूपाची रणनीती या निवडणुकीसाठी आखली होती. मात्र, स्वबळावर लढताना भाजपची दमछाक झाली असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच भाजपने त्यांची रणनीती आता आगामी काळात होत असलेल्या महापालिका त्यासोबतच झेडपी व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी बदलली आहे. त्यासाठीच आता भाजपने जुळवून घेत महायुतीत एकत्रित लढण्याचे प्लॅनिंग सुरु केले आहे.

गेल्या काही दिवसातील राज्याच्या राजकारणातील घडामोडी पहिल्या तर भाजपने आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीसाठी दोन पावले मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळेच महापालिका त्यासोबतच झेडपी व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी वेगळे प्लॅनिंग केले जात आहे. महायुतीमधील भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही पक्ष नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी स्वबळावर लढले होते. त्याचा फटका काहीअंशी महायुतीमधील तीन पक्षांना बसला होता. त्यामुळेच आता प्लनिंग बदलले जात आहे.

Eknath shinde, Ajit Pawar & devendra Fadanvis
BJP dominance : नगरपालिका निवडणूक भाजपच्या आमदार-खासदारांची जहागिरी : राष्ट्रवादी, शिवसेनेतही नात्यागोत्याचे वर्चस्व

राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये भाजपने (BJP) एकहाती वर्चस्व मिळवले आहे. राज्यात 288 पैकी सर्वाधिक 124 नगराध्यक्ष भाजपचे निवडून आले आहेत. त्यासोबतच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 61 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 36 नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. तर महाविकास आघाडीतील काँग्रेसचे 27 तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 8 तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 नगराध्यक्ष निवडून आले आहेत. त्यासोबतच या निवडणुकीत स्थानिक विकास आघाडी व अपक्ष असे मिळून 20 नगराध्यक्ष विजयी झाले आहेत.

Eknath shinde, Ajit Pawar & devendra Fadanvis
Shivsena politics : भाजपप्रमाणेच एकाच घरात शिवसेनेनं दिली 6 जणांना उमेदवारी..., मतदारांनी विषयच हार्ड केला

महायुतीमधील तीन पक्ष स्वबळावर लढल्याने भाजपचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः स्वबळावर 150 पेक्षा अधिक ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष निवडून येतील, असा अंदाज होता. तशास्वरूपाची रणनीती या निवडणुकीसाठी आखली होती. मात्र, स्वबळावर लढताना भाजपची दमछाक झाली असल्याचे दिसत आहे. विशेषतः पश्चिम विदर्भात मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. यापूर्वी लोकसभा निवडणुकीतही विदर्भात काँग्रेसला यश मिळाले होत त्याचप्रमाणे आता काँग्रेसला (Congress) काही अंशी यश मिळाल्याने भाजपला काहीसा फटका बसला आहे. भाजप स्वबळावर लढत असल्याचा फायदा याठिकाणी काँग्रेसला झाला आहे.

Eknath shinde, Ajit Pawar & devendra Fadanvis
Sharad Pawar NCP : काँग्रेसने साथ सोडली, पण राष्ट्रवादी ठाकरे बंधूंबरोबर; आघाडीसाठी पवारांना मुंबईत हव्या एवढ्या जागा!

भाजपला प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यात मोठा फटका बसला. याठिकाणी मुक्ताईनगर नगरपालिकेत शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पॅनलने विजय मिळवला. याठिकाणी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांना पराभवाचा धक्का बसला आहे. तर भुसावळ नगरपालिका निवडणुकीत भाजपचे मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांना धक्का बसला. मराठवाड्यातील लातूर, बीड, धाराशिव व नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच रंगली होती. त्यामुळे या ठिकाणी भाजपला मोठ्याप्रमाणात धक्का बसला आहे.

Eknath shinde, Ajit Pawar & devendra Fadanvis
Congress News : सोलापूरमध्ये काँग्रेसची धुळधाण : 12 नगरपालिकांमध्ये 'पंजावर' फक्त 2 नगरसेवक विजयी; प्रणिती शिंदे आहेत कुठे?

त्यासोबतच सोलापूर जिल्ह्यातील दुधनी, सांगोला, मोहोळ याठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने विजय मिळवला. कुर्डूवाडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने तर मंगळवेढा, पंढरपूरमध्ये तीर्थक्षेत्र आघाडीने तर अकलूजमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला. त्यामुळे याठिकाणी भाजप बॅकफूटला दिसली. नाशिक जिल्ह्यातील त्र्यबंकेश्वर नगरपालिकेत भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जोरदार रस्सीखेच दिसली. याठिकाणी एकनाथ शिंदे यांचा नगराध्यक्ष निवडून आला आहे. याठिकाणी कुंभमेळा होणार असल्याने या पदाला महत्त्व प्राप्त झाले होते.

Eknath shinde, Ajit Pawar & devendra Fadanvis
BJP Vs Shivsena : भाजप-शिवसेना भिडले; पालघर जिल्ह्यात कुणाची सत्ता? निकालाने सगळेच अंदाज फेल, चार नगरपरिषदे पैकी...

त्यासोबतच या निवडणुकीत भाजपच्या खालोखाल यश एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाले आहे. या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 61 नगराध्यक्ष निवडून आले आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 36 नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी स्वबळावर लढताना मोठी ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळेच महापालिका त्यासोबतच झेडपी व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी बदलली आहे. त्यासाठीच आता भाजपने जुळवून घेत महायुतीत एकत्रित लढण्याचे प्लॅनिंग सुरु केले आहे.

Eknath shinde, Ajit Pawar & devendra Fadanvis
BJP Politics : शेवटच्या क्षणी रवींद्र चव्हाणांनी पत्ते फिरवले अन् भाजपने इतिहास रचत मिळवला दणदणीत विजय, प्रथमच नगराध्यक्षही झाला

नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीतील निकालानंतर त्याचे विश्लेषण केले जात आहे. येत्या काळात महायुतीमधील तीन पक्षात होत असलेले मतांचे विभाजन टाळण्यासाठी महायुतीचा 'एकत्रित' फॉर्म्युला तयार केला जात आहे. आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये जागावाटपाचे नवे समीकरण ठरणार आहे. त्यासाठी चाचपणी केली जात आहे. त्यामुळे सर्वांचेच त्याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Eknath shinde, Ajit Pawar & devendra Fadanvis
Shivsena politics : भाजपप्रमाणेच एकाच घरात शिवसेनेनं दिली 6 जणांना उमेदवारी..., मतदारांनी विषयच हार्ड केला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com