BJP Sarkarnama
कोकण

BJP Setback : नितेश राणेंच्या निकटवर्तीय नेत्याचा भाजपला धक्का! उपाध्यक्षासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा पक्षाला रामराम; युवा मोर्चाला मोठं खिंडार

BJP Leader And Workers Join MNS : भाजपला विविध राज्यात धक्क्यांवर धक्के बसत असतानाच राज्यात देखील मोठा धक्का बसला आहे. भाजप युवा मोर्चाच्या उपाध्यक्षासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला आहे.

Aslam Shanedivan

Mumbai News : भाजपला विविध राज्यात धक्क्यांवर धक्के मिळत असतानाच मुंबईतही मोठा धक्का बसला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मनसेविरोधातील युवा मोर्चाच्या आंदोलनाच्या पद्धतीवर व्यक्त केलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या युवा संघटनेतील प्रमुख नेत्यासह कार्यकर्त्यांनी वेगळा मार्ग निवडला आहे.

उत्तर-पश्चिम मुंबई उपनगरचे माजी उपाध्यक्षासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे भाजप-मनसेमधील राजकीय वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुण्याचा दौरा करत मनसे नेते अमित ठाकरे यांनी शासकीय महाविद्यालयातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवला होता. यावरून राज्यात चांगलाच वाद पेटला होता. मनसेच्या या कारवाईवरून भारतीय जनता युवा मोर्चाने आक्रमक भूमिका घेत अमित ठाकरे यांचा निषेध केला होता.

पुण्यासह मुंबईत मोर्चा काढला होता. ज्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी युवा मोर्चाच्या आंदोलनावर नाराजी व्यक्त केली होती. तसेच अशी आंदोलने करताना संयम ठेवा, असे म्हणत आपल्याच पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे कान टोचले होते.

यावरून राज्यभर चांगलीच चर्चा रंगली होती. अशातच मनसेनं भाजपचा बडा नेता फोडला आहे. मंत्री नितेश राणे यांचे निकटवर्तीय दाऊद शेख यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत मनसेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील भाजपला रामराम ठोकला आहे. यामुळे एकीकडे भाजपच्या युवा संघटनेला मोठे खिंडार पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तर दुसरीकडे मुंबईत भाजप-मनसेमधील राजकीय संघर्ष वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शेख हे मंत्री नितेश राणे यांचे निकटवर्तीय मानले जात असून, शेख यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वासह पक्षातील पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे राणेंसह भाजपला हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. तर शेख यांनी शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह अमित ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत मनसेमध्ये प्रवेश केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT