BJP Setback : उत्तर प्रदेशमध्ये राजकीय भूकंप! विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; काँग्रेसमध्ये केला प्रवेश

UP BJP Leader Heera Thakur Joins Congress : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या राजकीय घडामोडींना ऊत आला असून भाजपमधील अंतर्गत वादाला तोंड फुटले आहे.
UP BJP Senior Leader Heera Thakur Joins Congress
UP BJP Senior Leader Heera Thakur Joins Congresssarkarnama
Published on
Updated on

Uttar Pradesh BJP News : उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून येथे भाजपमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. या वादामुळे भाजपच्या बड्या नेत्याने तडकाफडकी राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. वरिष्ठ नेते आणि माजी विधानपरिषद सदस्य हिरा ठाकूर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा दिल्याने भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. तर ठाकूर यांचा प्रवेश काँग्रेससाठी महत्त्वाचा मानला जात आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर भाजप आणि एनडीएमध्ये जोरदार इनकमिंग सुरू झाले होते. पण विविध राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे वरिष्ठ नेते हिरा ठाकूर (Hira Thakur) यांनी जातीय जनगणनेच्या मुद्द्यावरून प्रश्न उपस्थित करत भाजपला रामराम ठोकला. त्यांनी तडकाफडकी राजीनामा देत मागासवर्गीयांवर अन्याय झाल्याचा आरोप केला आहे. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने राजकारणात वारे उलटे फिरल्याची चर्चा सुरू झाली आहे.

हिरा ठाकूर यांनी काँग्रेसचे उत्तर प्रदेश प्रभारी राजेंद्र पाल गौतम, पक्षाचे ओबीसी विभागाचे अध्यक्ष अनिल जयहिंद आणि खासदार राकेश राठोड यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी अनिल जयहिंद यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करत भाजपने (BJP) जातीआधारित जनगणनेच्या आधारावर अनुसूचित जाती, जमातींसोबत मोठा धोका केल्याची टीका केली.

UP BJP Senior Leader Heera Thakur Joins Congress
BJP Setback : भाजपला मोठा झटका! तीन खासदारांचा पाठींबा देण्यास नकार; ममता बॅनर्जींनी गेम फिरवला?

ठाकूर यांनी जातीय जनगणनेच्या मुद्द्यावरून प्रश्न उपस्थित केले. त्यांनी जातीआधारित जनगणनेच्या आधारावर अनुसूचित जाती, जमातींसोबत मोठा धोका झाल्याचा दावा केला आहे. यामुळे आपण भाजप सोडण्याचा निर्णय घेतल्याचेही ठाकूर यांनी म्हटले आहे. ठाकूर यांनी प्रवेश करताना कर्पूरी ठाकूर यांचे स्मरण करत, कर्पूरी ठाकूर हे देशातील असे पहिले नेते होते, ज्यांनी बिहारमधील मागासवर्गीय लोकांना सर्वात पहिल्यांदा आरक्षण दिले. मात्र, अजूनही अनेक लोक आपल्या अधिकारांपासून वंचित आहेत. दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी घेतलेल्या भूमिकेचे देखील समर्थन केले आहे.

UP BJP Senior Leader Heera Thakur Joins Congress
BJP Setback : कोकणात भाजपला राजकीय धक्का : बावनकुळेंचा दौरा संपताच, बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये पुढच्या वर्षी विधानसभेची निवडणूक होणार असून आतापासूनच येथे राजकीय वर्तुळाचे तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे. राजकीय घडामोडींना वेग आला असून भाजपला अंतर्गत कलहाला तोंड द्यावे लागत आहे. अशातच तब्बल बारा वर्षे विधान परिषदेचे सदस्य असणाऱ्या हिरा ठाकूर यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने भाजपला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. हिरा ठाकूर उत्तर प्रदेश राज्याच्या मागास वर्ग आयोगाचे उपाध्यक्ष देखील असून त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा प्राप्त होता. त्यांनी अनेकदा मागास वर्ग आयोगाच्या विविध समस्यांवर आक्रमक पवित्रा घेतला होता. तर आंदोलने देखील केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com