BJP Setback : भाजपला मोठा झटका! तीन खासदारांचा पाठींबा देण्यास नकार; ममता बॅनर्जींनी गेम फिरवला?

NDA Yusuf Pathan Abu Taher Khan Khalilur Rahman : तृणमूलमध्ये बंडखोरी करत एनडीएसोबत गेलेल्या खासदारांमधील तिघांना भाजप,एनडीएला पाठींबा देण्यास नकार दिला आहे.
BJP Faces Setback as 3 MPs Refuse Support, Mamata Gains Edge
BJP Faces Setback as 3 MPs Refuse Support, Mamata Gains EdgeSarkarnama
Published on
Updated on

BJP vs TMC latest update: तृणमूल काँग्रेसच्या तब्बल 20 खासदारांनी बंडखोरी करत आपला नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया' (एनसीपीआय) या पक्षात विलीन केला होता. या गटाने भाजप नेतृत्व करत असलेल्या एनडीएला पाठींबा दिला आहे. मात्र, आता तीन बंडखोर खासदारांनी एनडीएला आपला पाठींबा नसल्याची भूमिका घेतली आहे.

एनडीएची बैठक नुकतीच पार पडली. त्यामध्ये एनसीपीआयमध्ये विलीन झालेल्या तीन मुस्लिम खासदारांनी दांडी मारली. यातील एका नेत्याने भाजपला थेट इशारा देत म्हटले की, 'भाजप किंवा एनडीएचा आम्ही भाग नाही.'

'मुस्लिम समाजाच्या विरोधात जाणाऱ्या कोणत्याही विधेयकाला आम्ही पाठिंबा देणार नाही," अशी ठाम भूमिका या तीन खासदारांनी घेतली आहे.

भाजपला पाठींबा देण्यास नकार देणाऱ्या खासदारांमध्ये युसूफ पठाण, जांगीपूरचे खासदार खलीलुर रहमान आणि मुर्शिदाबादचे खासदार अबू ताहेर खान यांचा समावेश आहे. यापूर्वी देखील या तिघांना 21 जुलैला एनडीएच्या संसदीय पक्षाच्या पहिल्या 'मंगल मिलन' बैठकीला उपस्थित लावली नव्हती.

BJP Faces Setback as 3 MPs Refuse Support, Mamata Gains Edge
DK Shivkumar: कर्नाटकात काँग्रेस सरकारमध्ये धुसफूस! मुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी मंत्र्यांच्या राजीनाम्यावर स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, राजकारणाचा भाग...

मतदारसंघात नाराजी

मिळालेल्या माहितीनुसार, या तीनही खासदारांच्या मतदारसंघात भाजपशी असलेल्या जवळीक वाढत असल्यामुळे नाराजीचे वातावरण होते. मतदारसंघातील लोक खासदारांच्या विरोधात मत मांडत होते. त्यामुळे या खासदारांनी भाजपपासून अंतर राखण्याचा निर्णय घेतला.

खासदार अबू ताहेर खान पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आम्ही भाजप, एनडीएसोबत नाही मात्र, मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी बोलावलेल्या बैठकीला आम्ही उपस्थित राहू. या बैठकीत आमच्या मतदारसंघातील विकासकामांवर चर्चा होणार आहे.

BJP Faces Setback as 3 MPs Refuse Support, Mamata Gains Edge
Mamata Banerjee News : अधिवेशनाच्या तिसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींना 'दे धक्का'; लोकसभा अध्यक्षांची 'टीएमसी'च्या खासदारावर मोठी कारवाई

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com