BJP Leaders Clash News : भाजप नेते आणि महायुती सरकारमधील मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी बकरी-ईदबाबत केलेल्या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यांनी मुस्लिम समाजाला बकरीद ‘व्हर्च्युअल’ साजरी करण्याचे आणि संगणकावर (कॉम्प्युटर) फोटो दाखवून कुर्बानी देण्याचे आव्हान केले आहे. यावरूनच आता नवीन राजकीय वाद सुरू झाला असून भाजपच्याच बड्या नेत्याने त्यांना घरचा आहेर देत “नितेश राणे यांनी त्यांच्या मटणाच्या दुकानाकडे लक्ष द्यावे, असा खोचक टोला लगावला आहे”. यामुळे आता बकरी-ईदच्या कुर्बानीवरून भाजपच्या नेत्यांमध्येच जुंपल्याचे चित्र आता पाहायला मिळत आहे.
बकरी ईदची मुस्लिम बांधवांकडून सगळीकडे तयारी केली जात असून याचवेळी भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत अनेकांवर तोफ डागली. त्यांनी कुर्बानीवरून मुस्लिम समाजाला डिवचत थेट कारवाईचा इशारा दिला. आम्हाला पर्यावरणाला अनुकूल अशी होळी साजरी करावी, कोरडी होळी साजरी करा. फटाके फोडू नका असे काही दीड शहाणे सल्ला देतात. पण आता जे असे म्हणतात, त्यांनी या लोकांना सल्ला द्यावा, त्यांनी आभासी बकऱ्याचा बळी द्यावा.
राणेंच्या या टीकेनंतर आता नवा वाद सुरू झाला असून भाजप नेते हाजी अराफत शेख यांनी राणेंच्या विरोधात भूमिका घेतली आहे. तसेच त्यांनी राणे यांच्या विरोधात मैदानात उतरत घरचा आहेर दिला आहे. यामुळे आता भाजपमध्येच अंतर्गत वाद उफाळून आल्याचे दिसत असून शेख यांनी नितेश राणे यांना नारायण राणे यांच्याकडून ज्ञान घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच "तुमच्या वडिलांनी मटणाच्या दुकानापासूनच सुरुवात केली होती," अशी आठवणही करून देत ईदनिमित्त मटण खाण्याचे थेट निमंत्रण दिले आहे. ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
शेख यांनी, त्यांच्या वडिलांनी मटणाच्या दुकानापासूनच सुरुवात केली होती, नितेश राणे यांनी त्या दुकानाकडे लक्ष द्यावे. बकरी-ईदच्या सणाला मंत्र्यांनी अशी वक्तव्य करू नयेत. नारायण राणे मटणाच्या दुकानामुळेच मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले आणि केंद्रात देखील मोठ्या पदावर पोहोचले आहेत. तर चेंबूरमध्ये राणेंच्या आईच्या नावाने असलेल्या हॉटेलमध्ये मांसाहारी पदार्थ मिळतात. यामुळे नितेश राणे यांनी त्यांच्या मटणाच्या दुकानासह हॉटेलकडे लक्ष द्यावे, असेही शेख यांनी म्हटलं आहे.
तसेच नितेश राणे यांना फक्त कागदावर न बोलता रविवारी मटण खात असाल, तर त्याऐवजी एकदा कागद खाऊन नक्की पहावा. म्हणजे तुम्हाला त्याची चव कशी असते, हे समजेल, असा खोचक टोला लगावला. तसेच शेळ्या-मेंढ्यांची वाहतूक करणारी वाहने अडवली जात असल्याचा मुद्दा उपस्थित करताना, हिंदू खाटीक समाज, धनगर, मुस्लिम, कुरेशी समाज त्रस्त झाला आहे. कसाई समाजाला वर्षातून एकदाच मोठी कमाई करण्याची संधी मिळते. पण आता मंत्रीच अशी वक्तव्य करत असेल तर आमच्यासाठी कोण उभं राहणार असा सवाल हा समाज करत असल्याचेही शेख यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.