Nitesh Rane : 'ताफ्यातल्या गाड्या कमी केल्याचा फडणवीसांच्या लाडक्या मंत्र्याचा दावा फोल : पुढे-मागे धावल्या डझनभर गाड्या; व्हिडिओ व्हायरल...

nitesh rane convoy video viral after pm narendra modi appeal : देशाचे पंतप्रधान मोदी यांनी इंधन संकट आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना काटकसर आणि बचत करण्याचे आवाहन केले होते.
BJP Leader nitesh rane convoy Video Viral; CM devendra fadnavis
BJP Leader nitesh rane convoy Video Viral; CM devendra fadnavissarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतरही नितेश राणेंच्या मोठ्या वाहन ताफ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  2. गाड्यांची संख्या कमी केल्याचा दावा केल्यानंतर अवघ्या 24 तासांतच त्यांच्यावर विरोधकांनी टीका सुरू केली आहे.

  3. या घटनेमुळे भाजप नेत्यांच्या आचरणावर आणि इंधन बचतीच्या संदेशावर राजकीय चर्चा रंगल्या आहेत.

sindhudurg guardian minister news : इंधन संकट आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना काटकसर आणि बचत करण्याचे आवाहन केले होते. यावेळी त्यांनी, इंधन बचत, सोने खरेदी टाळा, वर्क फ्रॉम होम करण्यासह अनावश्यक प्रवास टाळा असे म्हटले होते. तर परदेश दौरे आणि परदेशी वस्तूंचा वापर कमी करत 'व्होकल फॉर लोकल'चा अवलंब करावा असेही ते म्हणाले होते.

पण आता त्याच्या या आवाहनाला हरताळ फासण्याचे काम त्यांच्याच पक्षाचे नेते करताना दिसत आहे. आपण आपल्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी केल्याचा दावा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा भाजप नेते नितेश राणे यांनी केला होता. पण आता २४ तास होण्याच्या आधीच त्यांचा हा दावा खोटा ठरला असून ताफ्यात तब्बल डझनभर गाड्या धावल्या आहेत. सध्या याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल होत असून यावर चर्चा होताना दिसत आहे.

इराण आणि अमेरिका युद्धामुळे देशभरासह इंधन टंचाई निर्माण झाली आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसापूर्वीच पेट्रोल आणि डिझेलचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले होते. तसेच त्यांनी सोने खरेदी आणि परदेश दौरे टाळण्याचेही आवाहन केले होते. ज्यानंतर भाजपमधील मंत्र्यांसह नेत्यांनी यावर काम देखील सुरू केल्याचे दिसून आले. तर या आवाहनावर विरोधकांसह सर्वसामान्यांनी जोरदार टीका केली.

BJP Leader nitesh rane convoy Video Viral; CM devendra fadnavis
नितेश राणेंना मोठा दिलासा, कारावासाच्या शिक्षेला स्थगिती, Nitesh Rane Case Update, Sindhudurg News

तर या आवाहानाला प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याणमंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या कुटुंबासोबत नियोजित असलेला युरोप दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला. ज्याची राज्यभर चांगलीच चर्चा झाली.

एकीकडे या सकारात्मक निर्णयांची राज्यभर चर्चा होत असतानाच भाजपच्याच नेत्यांनी मंत्र्यांनी आणि आमदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे आवाहन धुडकावताना दिसत आहेत. या आमदार, मंत्र्यांकडून VIP ट्रिटमेंट अन् गाड्यांचा ताफा घेऊन फिरताना दिसत आहे. ज्यामुळे विरोधकांना आयतं कोलीत मिळाले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी देखील पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनास बाजूला सारल्याचे आता समोर येत आहे. त्यांच्या रायगडमधल्या दौऱ्याचा आता एक व्हिडिओ समोर येत असून ज्यात 12 गाड्यांचा ताफा दिसून आला. नितेश राणे भरडखोल जेट्टीच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी आले होते. यावेळी त्यांच्यासोबत 12 गाड्यांचा ताफा धावताना दिसत होता. ज्यानंतर आता जोरदार टीका होताना दिसत आहे.

कारण २४ तास आधीच नितेश राणे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनावर आपण सकारात्मक निर्णय घेतल्याचे सांगत आपल्या ताफ्यातील गाड्या कमी केल्याचा दावा केला होता. त्यांनी मी माझ्या ताफ्यातल्या गाड्या कमी केल्या असून माझ्या ताफ्यात आधी सहा ते सात गाड्या होत्या. पण आता त्या तीन-दोनवर आणल्या आहेत.

तर पालकमंत्र्यांसाठी जिल्हा प्रशासनाची असणारी गाडीही आता इलेक्ट्रिक घेतली जाणार आहे. सकारात्मक बदल स्वीकारले तरच पंतप्रधान मोदींचा हेतू, उद्दिष्ट्य निश्चित साध्य होईल असे म्हटले आहे. पण आता त्यांचा दावाच फोट ठरल्याची येथे चर्चा सुरू झाली असून १२ गाड्यांच्या ताफ्यावरून उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

BJP Leader nitesh rane convoy Video Viral; CM devendra fadnavis
'लाचारीचे दुसरे नाव उद्धव ठाकरे' Nitesh Rane यांची Uddhav Thackeray यांच्यावर टीका।Sindhudurg News

FAQs :

1. नितेश राणे कोणत्या कारणामुळे चर्चेत आहेत?

त्यांच्या वाहन ताफ्याचा व्हायरल व्हिडिओ आणि गाड्या कमी केल्याच्या दाव्यावरून ते चर्चेत आले आहेत.

2. या वादाची सुरुवात कशी झाली?

नितेश राणे यांनी आपल्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी केल्याचा दावा केला होता.

3. व्हिडिओमध्ये काय दिसत आहे?

व्हिडिओमध्ये मोठ्या संख्येने गाड्या ताफ्यात धावताना दिसत असल्याची चर्चा आहे.

4. या घटनेचा संबंध कोणत्या मुद्द्याशी जोडला जात आहे?

इंधन बचत आणि काटकसरीच्या आवाहनाशी या घटनेचा संबंध जोडला जात आहे.

5. सोशल मीडियावर याबाबत काय प्रतिक्रिया उमटत आहेत?

या व्हिडिओवरून विविध राजकीय प्रतिक्रिया आणि चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com