Devendra Fadnavis sarkarnama
कोकण

मोठी बातमी! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद करताना फडणवीसांनी घेतला मच्छीमारांसाठी मोठा निर्णय, मंत्री राणेंच्या पाठपुराव्याला यश

Nitesh Rane thanks Devendra Fadnavis For ₹100 crore Aid : राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आज पत्रकार परिषद घेत महत्वाची घोषणा केली.

Aslam Shanedivan

  1. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी तळकोकणातील मच्छीमार बांधवांसाठी 100 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.

  2. ही मदत मच्छीमारांच्या बोटींच्या नुकसानीसाठी आणि किनारपट्टीवरील पुनर्वसनासाठी करण्यात आली आहे.

  3. मंत्री नितेश राणे यांनी या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे ट्विटद्वारे आभार मानले आहेत.

Konkan News : राज्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. पिकासह शेत जमिनीही खरडून गेल्या होत्या. यामुळे हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना लवकर आर्थिक मदत करावी, अशी मागणी विरोधकांसह शेतकरी संघटनांनी केली होती. तसेच केंद्राची वाट न पाहता राज्य सरकारने निर्णय घ्यावा यासाठी दबाव निर्माण केला होता. याचपार्श्वभूमिवर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी कोणता निर्णय होतो. याकडे अख्या राज्याचे लक्ष लागले होते.

याचदरम्यान मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची घोषणा केली. फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत अतिवृष्टीग्रस्तांसाठी तब्बल 31 हजार 628 कोटी रुपयांचे मदतीचे पॅकेज जाहीर केले. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या जमीन अतिवृष्टीने वाहून गेल्या त्यांना हेक्टरी 3.47 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

https://www.youtube.com/watch?v=K2CU7WxyDAkयाचवेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तळकोकणातील मच्छिमार बांधवांसाठी व मच्छीमारांच्या बोटींच्या नुकसान भरपाईसाठी 100 कोटींची मदत जाहीर केलीय. या तरतुदीबद्दल मंत्री नितेश राणे यांनी ट्विट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले आहेत.

मंत्री राणे यांनी केली होती मागणी

अतिवृष्टीच्या वेळी तळकोकणातही मोठा पाऊस झाला होता. यामुळे समुद्रही खवळला होता. खवळलेल्या समुद्राचा मच्छीमारांच्या बोटींना मोठा फटका बसला होता. बोटींचे नुकसान झाले होते. त्यावेळी मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन मच्छीमार बांधवांना दिलासा दिला होता.

त्यांनी नुकसानीची पाहणी करत आढावा घेतला होता. तसेच यावेळी तातडीने नुकसानीचा पंचनामा करून करण्याचे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. तसेच या संदर्भात मंत्री नितेश राणे यांनी वेळोवेळी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. याचीच दखल आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आली. तसेच नुकसानग्रस्त मच्छीमार बांधवांसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय.

FAQs :

प्र.1: मच्छीमारांसाठी किती निधी जाहीर करण्यात आला आहे?
👉 तळकोकणातील मच्छीमार बांधवांसाठी एकूण 100 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

प्र.2: ही मदत कोणत्या कारणासाठी दिली जाणार आहे?
👉 मच्छीमारांच्या बोटींच्या नुकसानीसाठी आणि आर्थिक पुनर्वसनासाठी ही मदत दिली जाईल.

प्र.3: ही घोषणा कोणी केली आहे?
👉 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी संयुक्तपणे ही घोषणा केली.

प्र.4: नितेश राणे यांनी या निर्णयावर काय प्रतिक्रिया दिली?
👉 नितेश राणे यांनी ट्विट करत मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार व्यक्त केले आहेत.

प्र.5: या निर्णयाचा फायदा कोणत्या जिल्ह्यांना होणार आहे?
👉 रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि इतर तळकोकणातील किनारपट्टी भागातील मच्छीमारांना या मदतीचा थेट लाभ होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT