नितेश राणे यांनी स्पष्ट केले की सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिंदे गटाच्या शिवसेनेशी युती होणार नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “मैत्रीपूर्ण लढती”साठी हिरवा कंदील दिल्याचे राणेंनी सांगितले.
या वक्तव्यानंतर उदय सामंतांना जशास तसे उत्तर दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Sindhudurg News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून तळकोकण आणि कोकणात महायुतीतील मतभेद आता चव्हाट्यावर येत आहेत. येथे भाजप, शिवसेना यांच्यात वाद आता विकोलापाला गेला आहे. येथे दोन्ही पक्षांनी स्वबळाचा नारा देत स्थानिकसाठी पेरणी सुरू केली आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप नेते मंत्री नितेश राणे यांनी स्वबळाचा नारा दिल्यावरून शिवसेना नेते उदय सामंत यांनी आधी त्यांचे कौतुक केले. मात्र त्यानंतर त्यांनी सिंधुदुर्गमध्ये काय होतं ते बघू आणि रत्नागिरीत तोच पॅटर्न राबवू असे म्हणत एकप्रकारे नितेश राणेंनाच चेतावणी दिली होती. यावरून नितेश राणेंनी सिंधुदुर्गात मैत्रीपूर्ण लढविल्या जातील असे सांगत सामंत यांना उत्तर दिले आहे. यामुळे आता जिल्ह्यात आगामी स्थानिकसाठी युती होणार नाही हेच आता स्पष्ट झाले आहे.
नितेश राणे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत स्पष्टीकरण देताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीतील मित्र पक्ष असणाऱ्या शिवसेनेशी युती होणार नाही. येथे मैत्रीपूर्ण लढती लढविल्या जातील. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रीन सिग्नल दिल्याचे म्हटले आहे.
तसेच त्यांनी, महायुतीतील सर्वच राजकीय पक्ष सध्या स्वबळावर निवडणुका लढविण्याच्या मूडमध्ये गेले आहेत. आम्ही देखील स्वबळावर निवडणुका लढण्याचा तयारीला लागलेलो आहोत. जिल्ह्यात दोन्ही पक्षांची तुल्यबळ ताकद असताना उगाचच शिवसेना-भाजप मध्ये युती का? कशाला. अशी युती करून आम्ही बंडखोरीला का प्रोत्साहन का देऊ? असाही सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला आहे.
जिल्ह्यात आमच्यासह शिवसेनेकडे तुल्यबळ उमेदावार आहेत. उलट ठाकरेंची शिवसेना असो किंवा महाविकास आघाडीतील इतर पक्ष त्यांच्याकडे उमेदवारच नाहीत. त्यांच्याकडे उमेदवार उभे करण्याची क्षमता ही नाही.
त्यामुळे महायुतीतीच मैत्रीपूर्ण निवडणूक लढवू आणि निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र सत्ता स्थापन करू. यासाठी दोन्ही पक्षांची स्वबळाची तयारी आहे. पण आता उदय सामंत शिंदेंच्या शिवसेनेची ताकत दाखवू असे म्हणत आहेत. तशी त्यांना ताकद दाखवायची इच्छा असेल, तर ती त्यांनी दाखवावी.
आम्हाला कोण काय म्हणत हे महत्वाचं नाही. तर आमच्यासाठी देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण आणि नारायण राणे काय बोलतात हे महत्वाचे आहे. तर आगामी स्थानिकबाबत आमची प्रदेश कार्यालयात बैठक झाली असून भांड्याला भांड लावणं आमचं काम नाही. तर जनतेला कोण किती भांडते याच्याशीही संबध नाही. जनतेला विकास हवा असून तोच आम्हाला करायचा आहे.
यासाठी आमच्या नेत्यांशी आमचे बोलण झालं असून आमचा निर्णयही झाला आहे. आम्हाला आमच्या नेत्यांनी स्वबळावर निवडून लढण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आम्ही कामाला लागलो असून आमचा कार्यकर्तादेखील कामाला लागल्याचे नितेश राणेंनी सागितले आहे.
1️. नितेश राणे यांनी कोणत्या निवडणुकीबाबत भूमिका मांडली?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केली.
2️. सिंधुदुर्गात कोणत्या पक्षाशी युती होणार नाही असे त्यांनी सांगितले?
शिंदे गटाच्या शिवसेनेशी युती होणार नाही असे त्यांनी सांगितले.
3️. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या बाबत काय भूमिका आहे?
राणेंच्या म्हणण्यानुसार फडणवीस यांनी “मैत्रीपूर्ण लढती”ला ग्रीन सिग्नल दिला आहे.
4️. या वक्तव्यावर कोणाची प्रतिक्रिया चर्चेत आहे?
रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांना अप्रत्यक्ष प्रत्युत्तर दिल्याची चर्चा आहे.
5️. या निर्णयाचा महायुतीवर काय परिणाम होऊ शकतो?
स्थानिक पातळीवर महायुतीच्या पक्षांत मतभेद वाढण्याची शक्यता दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.