Chiplun News : विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांनंतर चिपळूणमध्ये भाजपची संघटनात्मक ताकद वाढली असतानाच पदे आणि जबाबदाऱ्यांवरून पक्षांतर्गत कलह सुरू झाला आहे. काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याची माहिती असून वरिष्ठ पातळीवरील चर्चेनंतर ते मागे घेतल्याचे समजते. या राजकीय हालचालींमुळे चिपळूणसह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या काही वर्षांत चिपळूणमध्ये भाजपने आपली संघटना विस्तारली असून नुकताच झालेल्या काही मोठ्या पक्ष प्रवेशानंतर येथे पक्षाचा विस्तार मोठा होताना दिसत आहे. विविध स्तरांतून पक्षात नव्या कार्यकर्त्यांचे ‘इनकमिंग’ वाढले आहे. मात्र जुन्या-नव्यांचा समन्वयाचा मुद्दा देखील आता ऐरणीवर आला आहे. नव्या कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या देताना दीर्घकाळ पक्षासाठी काम करणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची तीव्र भावना समोर येत आहे. तर जुन्या कार्यकर्त्यांच्या योगदानाची दखल घेऊन योग्य स्थान मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या जुन्या-नव्यावरूनच भाजपमध्ये नाराजी नाट्य रंगले असून राजीनामा नाट्याला देखील सुरुवात झाल्याचे समोर आले आहेत. पक्षातील काहींनी आपल्या पदांचा राजीनामा देत याबाबत नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. तर काहींना थेट वरिष्ठांनी राजीनामा देण्याचे आदेश दिल्याचेही बोलले जात आहे.
यामागे राजकीय कुरघोड्या व तक्रारी असून एकमेकांविरूद्ध छुप्या पद्धतीने डाव खेळले जात आहेत. यातूनच पडद्यामागून सूत्रे हलवले जात असून काहींना राजीनामाच देण्याचे थेट आदेश वरिष्ठ पातळीवरून येताना दिसत आहेत. यामागे एक व्यक्ती, एक पद, एक कुटुंब एक पद असे पक्षाचे सुत्राचे कारण दिले जात असून एकाच घरात दोन-तीन पदे देऊन पक्ष बळकट होणार का? असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे. तर याच कारणावरून आता काही जुन्या कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पण त्यांना राजीनामे मागे घेण्याचे आदेश दिल्यानंतर ते मागे घेण्यात आले आहेत.
तर गेले काही दिवसांपासून जे १ ते २ लोकप्रतिनिधी चर्चेत होते. त्यांना मात्र राजीनामा देण्यास वरिष्ठ पातळीवरून आदेश देण्यात आहेत. सध्या सुरू असणाऱ्या या राजकीय हालचालींमुळे येथील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणावरून महेश दीक्षित यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी, जुन्या कार्यकर्त्यांचा अनुभव आणि नव्या कार्यकर्त्यांचा उत्साह, या दोन्हींचा संघटनेला उपयोग झाला पाहिजे. पदे व जबाबदाऱ्यांबाबत संवादातून समन्वय साधणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.