BJP Crisis : MLC बिनविरोधत होताच भाजपला सर्वात मोठा धक्का; शहराध्यक्षासह संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा, महिला जिल्हाध्यक्षावर गंभीर आरोप

Konkan Sawantwadi Politics : कोकणात MLC बिनविरोधत होताच एकीकडे मंत्री नितेश राणेंच्या मास्टर स्ट्रोकची चर्चा राज्यभर होत असतानाच त्यांच्याच जिल्ह्यात पक्षांतर्गत संघर्ष उपाळूण आला आहे.
Konkan Sawantwadi Politics; BJP Nitesh Rane
Konkan Sawantwadi Politics; BJP Nitesh Rane sarkarnama
Published on
Updated on

Sawantwadi News : राज्यात होत असलेल्या 17 जागांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानाआधीच तब्बल 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध झाले आहेत. यात कोकणाच्या एका जागेचा समावेश असून राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे बिनविरोध होण्यात भाजप नेते तथा मंत्री नितेश राणे यांचा मोठा हात असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्याच शिष्टाईने बाळ माने यांनी माघार घेतल्याची चर्चा आहे. यामुळे कोकणात जल्लोषाचे वातावरण आहे.

एकीकडे असे वातावरण असतानाच दुसरीकडे नितेश राणे होम पिचवरील पक्षांतर्गत वाद मिटवता आलेला नाही. अंतर्गत संघर्ष आणि पक्षातील वरीष्ठ नेत्यांच्या दबावामुळे सावंतवाडी शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर आणि संपूर्ण शहर कार्यकारिणीने राजीनामा दिला आहे. या राजीनाम्याने भाजपमध्ये मोठा राजकीय भूकंप आला आहे. तर मडगावकर यांनी भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर व भाजप सरचिटणीस महेश सारंग यांच्यावर नाव घेत आरोप केल्याने राजकीय संकट निर्माण झाले आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील राजकारण तापलं होतं. ही जागा जिंकण्यासाठी महायुतीने साम-दाम-दंड भेद चा वापर केला. ज्यामुळे विधान परिषदेची हा जागा बिनविरोध झाली आहे. यामुळे कोकणातील तापलेलं राजकीय वातावरणही शांत झालं आहे. मात्र पक्षातील वाद आता चव्हाट्यावर आला असून शहराध्यक्षाने महिला जिल्हाध्यक्षासह सरचिटणीसांवर थेट नाव घेत आरोप केले आहेत. तसेच आपल्यासह अख्खी शहर कार्यकारिणीनीचा राजीनामा दिला आहे. यामुळे जिल्ह्यासह भाजपला जोरदार हादरे बसले आहेत.

Konkan Sawantwadi Politics; BJP Nitesh Rane
BJP Crisis : भाजपमधील अंतर्गत वाद उफाळला, मंत्री चंद्रकांत पाटीलांच्यावर भाजप संपवण्याचा आरोप, शिवाजी पाटलांनी थेट विषयच काढला

मडगावकर यांनी याबाबत भाजप मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. यावेळी त्यांनी, 'एक व्यक्ती एक पद’ या नियमावर बोट ठेवून आपल्यावर अन्याय केला जात आहे. पक्षातील अनेक नेत्यांकडे दोन-दोन पदे असताही महिला जिल्हाध्यक्षांनी माझ्याकडे कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच पदाचा राजीनामा मागितला. महिला जिल्हाध्यक्षा या सावंतवाडीत येऊन ढवळाढवळ करणाऱ्या सूत्रधाराच्या इशाऱ्यावर काम करत आहेत. त्या सूत्रधाराला त्या का घाबरतात? असा सवाल मडगावकर यांनी केला आहे.

तसेच त्या सूत्रधाराच्या सततच्या हस्तक्षेपामुळे आणि छुप्या कारवायांमुळेच आपण आणि महिला कार्यकारीणीतील पदाधिकारी राजीनामा देत असल्याचे म्हटलं आहे. तसेच मडगावकर यांनी, आपण केवळ पक्षाच्या पदाचा राजीनामा देत असून भाजपमध्येच राहून जनतेची सेवा करणार असल्याचे म्हटलं आहे.

यावेळी मडगावकर यांनी, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर या जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांच्या दबावात काम करत असल्याचे म्हटलं आहे. तर या सर्व यंत्रणे मागचे सूत्रधार सारंगच असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. तर महिलांच्या कार्यात आणि शहराच्या राजकारणात पुरूषाने ढवळाढवळ करणे योग्य नसल्याचे म्हणत माझ्या जागी दुसऱ्याला बसवण्याचा डाव आखला जात आहे. असा प्रकार याआधीही दोनवेळा झाला असून जशी महेश सारंग चावी फिरवतात तशा श्वेता कोरगावकर काम करतात. तशा त्या बोलतात असा आरोप केला आहे.

Konkan Sawantwadi Politics; BJP Nitesh Rane
BJP Crisis : भाजपला धक्का! कोकणात राजकीय भूकंप; हाकालपट्टी केलेल्या बड्या नेत्याने केला असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश

तसेच मडगावकर यांनी, सातत्याने आपली बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असून ती थांबवावी अन्यथा आपल्याकडेही इत्यंभूत माहिती आहे. गरज पडल्यास ती बाहेर काढू असाही इशारा मडगावकर यांनी दिला आहे. तर आपण खास. नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे यांचा आदर करत असून ते देखील महिलांना आदर देतात. मात्र स्थानिक पदाधिकारी महिलांना तुच्छ लेखतात असाही दावा करत तिकीट देतानाही या मंडळींनी तिकीट कापण्याचा प्रयत्न केला होता, असा गौप्यस्फोटही मडगावकर यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com