BJP News : भाजपमधील वाद चव्हाट्यावर! आमदार शिवाजीराव पाटलांकडून मंत्री चंद्रकांत पाटील टार्गेट, म्हणाले, 'किती सहन करायचं...'

Shivajirao Patil Chandrakant Patil : भाजपचे सहयोगी आमदार शिवाजीराव पाटील यांनी थेट मंत्री चंद्रकांत पाटील यांना टार्गेट केले आहे. गोकुळच्या बैठकीनंतर त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.

Shivajirao Patil Chandrakant Patil
Shivajirao Patil Chandrakant Patilsarkarnama
Published on
Updated on

Gokul Meeting : भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील विरुद्ध भाजपचे सहयोगी आमदार शिवाजीराव पाटील यांच्यातील वाद थेट चव्हाट्यावर आला आहे. 2019 च्या निवडणुकीपासून अंतर्गत सुरू असलेला वाद गोकुळच्या निमित्ताने सात वर्षाने बाहेर आला आहे.

गोकुळ दूध संघाच्या बैठकीत निमंत्रित केले नसल्याने आमदार शिवाजीराव पाटील यांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे. ज्यांचा गोकुळच्या निवडणुकीशी काही संबंध नाही अशांना निमंत्रित केले. शिवाय चंद्रकांत पाटील हे भाजपच्या कोणत्याच कार्यकर्त्याला जवळ केले नसल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला आहे.

पाटील म्हणाले, माझे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकदा आदेश दिला की मी त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. त्यांच्या आदेश मी मान्य केला. महायुतीच्या नेत्यांनी एक बैठक घेतली या बैठकीसाठी राष्ट्रीय नेते चंद्रकांत पाटील यांनी या बैठकीला मला बोलावलं नाही.

मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, सुमित कदम या सगळ्यांना बोलावलं. गोकुळ दूध संघाबाबत महायुतीची बैठक घेतली. ज्यांचा काही संबंध नाही त्यांना सुद्धा महायुतीच्या बैठकीला बोलावलं पण मला बोलावलं नाही. ह्या लोकांकडून जर मला ग्राह्य धरलं जात नसेल तर मला सतेज पाटील लांबचे नाहीत. आम्हाला देखील भावना आहेत, किती सहन करायचं, अशा शब्दात आमदार शिवाजीराव पाटील यांनी रोष व्यक्त केला आहे.


Shivajirao Patil Chandrakant Patil
Gokul Politics: मुश्रीफांचा राग, कोरेंची मध्यस्ती, महाडिकांचा खुलासा अन् चंद्रकांत पाटलांचा तोडगा; गोकुळ महायुतीच्या बैठकीतली Inside Story जाणून घ्या

'गोकुळमध्ये तुमचा मुलगा चेअरमन, तुम्ही राज्याचे मंत्री हे सगळं असं असेल तर सामान्य शेतकऱ्याच्या मुलांनी कुठे जायचं.', असा प्रश्नही त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना उद्देशून केला.

पुढे बोलताना ते म्हणाले, मला चंद्रकांत पाटील यांच्याकडून अपेक्षा होत्या. पण मंत्री असूनही चंद्रकांत पाटील यांनी देखील चंदगडसाठी काहीही केलेलं नाही, ही खंत आहे. चंद्रकांतदादा मुश्रीफ साहेबांना सोबत घेऊन चाललेत पण भाजप म्हणून कोणत्याही कार्यकर्त्याला जवळ केलेलं नाही. किती दिवस सहन करायचं, हे लोक भाजप संपवायला निघाले आहेत. असाही आरोप आमदार शिवाजीराव पाटलांनी केला.


Shivajirao Patil Chandrakant Patil
Ahilyanagar Collector Office Controversy : विधान परिषद निवडणुकीवर ठाकरेंच्या शिलेदारांचा हल्लाबोल! रात्री उशिरापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय कसे सुरू? AIMIM-राष्ट्रवादी संबंधांवरही प्रश्नचिन्ह

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com