“Election Commission officials verifying Maharashtra local body voter lists to identify and remove duplicate names.” Sarkarnama
कोकण

uddhav thackeray Shivsena : कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेचा गड ढासळला; महत्त्वाच्या नेत्याने शिवबंधन तोडत हाती घेतले कमळ

Shivsena UBT Leader join BJP : आगामी स्थानिकच्या आधीच रायगडमधील राजकीय वातावरण तापलं असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. येथे माजी जिल्हा संपर्क प्रमुखाने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Aslam Shanedivan

  1. रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसला आहे.

  2. माजी जिल्हा संपर्क प्रमुखाने पक्षाला रामराम ठोकला आहे.

  3. तर अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रवेश करून आगामी स्थानिकच्या आधी भाजपची ताकद वाढवली आहे.

Raigad News : आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वारे वेगानं वाहू लागले असून कोकणात याचा वेग आता वाढला आहे. एकीकडे रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वाद वाढला असतानाच भाजप मात्र आपली ताकद वाढवत आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना एकमेकांचे पक्ष फोडताना दिसत असून भाजप मात्र येतील ते आपलेच म्हणत प्रवेश देताना दिसत आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला लक्ष करताना दिसत आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने रायगडमध्ये मोर्चे बांधणीला सुरूवात केलीय. नुकताच मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत रायगड जिल्हा संपर्क प्रमुख नागेंद्र राठोड यांनी प्रवेश केला. यावेळी खासदार धैर्यशील पाटील उपस्थित होते. या प्रवेशामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला असून आगामी स्थानिकच्या आधीच मोठी राजकीय उलथा पालथ झाली आहे.

रायगड मध्ये ठाकरेंचा शिवसेनेचा गड हळूहळू ढासळत चालला आहे. आगामी स्थानिकच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देखील ठाकरेंच्या शिवसेना लागलेली गळती अद्याप कमी झालेली नाही. तोच आता माजी रायगड जिल्हा संपर्क प्रमुख राठोड यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे.

तर राठोड गेल्या काही दिवसांपासून ते शिवसेनेच्या नेत्यांवर नाराज असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राठोड यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी देखील कमळ हाती घेतल्याने भाजपची ताकद वाढली आहे.

यामध्ये महाड, पोलादपुर, माणगावमधील पदाधिकाऱ्यांची संख्या मोठी आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश भाजप पक्षासाठी महत्वाचा मानला जात असून ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का देणारा आहे.

FAQs :

1. रायगडमध्ये भाजपने काय हालचाल केली आहे?
भाजपने स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवीन प्रवेश आणि संघटनबांधणी सुरू केली आहे.

2. नागेंद्र राठोड कोणत्या पक्षात गेले आहेत?
ते ठाकरे गटाच्या शिवसेनेतून बाहेर पडून भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

3. या प्रवेशावेळी कोण उपस्थित होते?
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार धैर्यशील पाटील उपस्थित होते.

4. या प्रवेशाचा राजकीय परिणाम काय झाला?
या प्रवेशामुळे रायगड जिल्ह्यात ठाकरे सेनेला मोठा धक्का बसला आहे.

5. आगामी निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
भाजपचा तळ बळकट होईल आणि स्थानिक निवडणुकांमध्ये शिवसेनेसमोर कडवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT