Uddhav Thackeray Shivsena
Uddhav Thackeray Shivsenasarkarnama

Uddhav Thackeray Shivsena : ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत पहिला संघर्ष, सांगलीत महायुतीसोबत दुसरा मुकाबला

Shivsena UBT Politics : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर लागलेली गळती आणि झालेला परभव ठाकरेंच्या शिवसेनेनं पचवला असून आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संघर्षासाठी शिवसेना तयारीला लागलेली आहे.
Published on
Summary
  1. ठाकरे गटाला आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून पहिला संघर्ष करावा लागणार आहे.

  2. प्रत्यक्ष निवडणुकीत ठाकरे सेनेचा सामना शिंदे गटाच्या शिवसेनेशी होणार आहे.

  3. या दुहेरी संघर्षातून ठाकरे सेना कितपत यशस्वी ठरणार हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईल.

Sangli News : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभव पचवल्यानंतर ठाकरेंची शिवसेना आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी संघर्ष करताना दिसत आहे. या दोन्ही निवडणुकीत महाविकास आघाडी सोबत लढत असताना लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनीच ठाकरेंच्या शिवसेनेचा घात केला. अपक्ष उमेदवारीचा फटका ठाकरेंच्या शिवसेनेला बसला. त्यामुळे उरल्या सुरल्या ठाकरेंच्या शिवसेनेला देखील जिल्ह्यात सुरुंग लागला. अशातच आगामी जिल्हा परिषद महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत पंचायत समितीच्या निवडणुकीत ठाकरे गटाला पहिला संघर्ष पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी करावा लागणार आहे. तर प्रत्यक्ष निवडणुकीतील संघर्ष हा शिंदेंच्या शिवसेनेसोबत असणार आहे. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना यावर कितपत मात मिळवणार हे आगामी निवडणुकीतच समजणार आहे.

सध्या ठाकरेंच्या शिवसेनेकडे सांगली जिल्ह्यात चार जिल्हाप्रमुख आहेत. प्रत्येकाला दोन-दोन विधानसभा मतदारसंघ दिले आहेत. त्यातील शंभूराज काटकर यांच्याकडे पलूस-कडेगांव, तासगाव-कवटेमहांकाळ, विशाल रजपूत यांच्याकडे सांगली-मिरज, संजय काटे यांच्याकडे जत-खानापूर-आटपाडी तर अभिजित पाटील यांच्याकडे शिराळा-इस्लामपूर या विधानसभा क्षेत्रातील जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये ही जागा ठाकरे यांच्या सेनेच्या वाटेला गेली. ठाकरेंच्या सेनेकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील सांगलीच्या मैदानातून रणांगणात उतरले. मात्र काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. त्यामुळे ठाकरेंच्या सेनेला फटका बसला.

Uddhav Thackeray Shivsena
‘Uddhav Thackeray म्हणजे मुंबईला लागलेला कोरोना’ Nilesh Rane यांचा शिवसेनेवर पलटवार

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेले यश पाहता अनेकांचा ओढा विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेकडे राहिला. पण अनेकांचा भ्रमनिरास झाला. विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या सेनेत आलेल्यांचा फुगा फुटला. शिवाय चंद्रहार पाटलांनी देखील ठाकरेंची साथ सोडली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनीदेखील ठाकरेंची साथ सोडली. दोघांनीही एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कोलमडलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर नेतृत्वाची चणचण आहे.

सध्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर चारीही जिल्हाप्रमुख आपापल्या मतदारसंघात तळ ठोकून आहेत. मात्र जिल्हास्तरीय नेतृत्वाची कमतरता ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आहे. शिवाय ज्या ठिकाणी ठाकरेंची सेना कुमकवत आहे. अशा ठिकाणी महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून ठाकरेंच्या शिवसेनेला विचारले जात नाही. ज्या ठिकाणी बलशाली आहे त्या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचा विचार केला जातो. एकंदरीतच सन्मानाने वागणूक दिली तर महाविकास आघाडीसोबत राहण्याचा निर्णय जिल्हाप्रमुख घेऊ शकतात. अशा मानसिकतेत ठाकरेंची शिवसेना आहे.

शिवाय ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने मुंबई, कोकणावर लक्ष ठेवून आहेत त्याच पद्धतीने सांगली जिल्ह्यावर त्यांचे लक्ष नाही असेही चित्र आहे. शिवसैनिकांच्या जोरावरच पक्ष संघटन मजबुतीकरण करण्याचे दिवसा स्वप्न ठाकरेंच्या गटाचे आहे. त्यामुळेच कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना मानसिक, आर्थिक बळ देणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे सहाजिकच ठाकरेंची सेना पहिल्या टप्प्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबतच संघर्ष करताना दिसत आहे.

Uddhav Thackeray Shivsena
Uddhav Thackeray: अ‍ॅनाकोंडाचा मुंबई गिळण्याचा प्लॅन! उद्धव ठाकरेंचा मोदी-शहांवर पुन्हा निशाणा

FAQs :

1. ठाकरे गटाला कोणत्या निवडणुका लढवायच्या आहेत?
आगामी जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि पंचायत समिती निवडणुका ठाकरे गट लढवणार आहे.

2. ठाकरे गटाला कोणत्या पक्षांशी संघर्ष करावा लागणार आहे?
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटाच्या शिवसेनेशी ठाकरे गटाचा सामना होणार आहे.

3. ठाकरे गटासाठी ही निवडणूक का महत्त्वाची आहे?
ही निवडणूक ठाकरे गटाच्या संघटनशक्तीची आणि जनाधाराची मोठी परीक्षा ठरणार आहे.

4. महाविकास आघाडी आणि महायुती यांचा यात कसा सहभाग आहे?
महाविकास आघाडीत अंतर्गत मतभेद वाढले असून, महायुतीतही शिंदे-फडणवीस यांच्यात समन्वय आव्हान ठरत आहे.

5. ठाकरे सेना या संघर्षावर मात करू शकेल का?
हे निकालानंतरच स्पष्ट होईल, मात्र ठाकरे गट आपला जनाधार वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com