Uddhav Thackeray Sarkarnama
कोकण

BJP Politics in Kokan : कोकणात राजकीय भूकंप! राज ठाकरेंनंतर उद्धव ठाकरेंनाही मोठा धक्का?, शिवसेनेचा युवा नेता महायुतीच्या वाटेवर

Shivsena UBT Crises : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली खेड मतदारसंघ सध्या चर्चेत आहे. येथे महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे नेते तथा खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर भाजपच्या वाटेवर आहेत. त्या पाठोपाठ आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनाला धक्का बसण्याची शक्यता आहे.

Aslam Shanedivan

Summary :

  1. रत्नागिरी जिल्ह्यात भाजपची ताकद सातत्याने वाढताना दिसत आहे.

  2. शिवसेना (उद्धव) गटातील एक युवा नेता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

  3. त्यामुळे पुन्हा एकदा "ऑपरेशन लोटस" सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे.

  4. या हालचालीमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात खळबळ उडाली आहे.

  5. कोकणातील राजकीय समीकरणे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलण्याची शक्यता आहे.

Ratnagiri News : मागील काही दिवसांपासून तळ कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार राजकीय हालचाली होत आहेत. येथे नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते प्रशांत यादव भाजपमध्ये प्रवेश केला. त्यापाठोपाठ खेडमध्ये देखील मोठा राजकीय भूकंप झाला. महाराष्ट्र नव निर्माण सेनेनं राज ठाकरे यांच्या आदेशानंतर खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर तडकाफडकी कारवाई केली. त्यांना पक्षातून निलंबित केले. तेही आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात भाजप मजबूत होताना दिसत आहे. अशात आणखीन भाजपची ताकद वाढणार असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा युवा नेताही भाजपच्या वाटेवर आहे. यामुळे येथे भाजपने पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस सुरू केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

भाजपने आगामी स्थानिकसाठी कंबर कसली असून मोठे चेहरे आपल्याकडे घेण्याची रणनीती आखळी आहे. त्याप्रमाणे आधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते प्रशांत यादव यांचा प्रवेश करून घेतला आहे. तर मनसेनं वैभव खेडेकर यांच्यावर कारवाई करताच मंत्री नितेश राणेंनी पहिला फोन करत त्यांना गळाला लावले. त्यामुळे जिल्ह्यात महायुतीत भाजपचे बळ वाढले आहेत

यादरम्यान आता दापोलीत मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील एक युवा नेता महायुतीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. दापोली, खेड, मंडणगड विधानसभा मतदारसंघातील ठाकरेंच्या शिवसेनेचा एक युवा नेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना व भाजपच्या पदाधिकाऱ्यांना भेटत आहे. त्यामुळे तो कोणता झेंडा हाती घेणार याची उत्सुकता जिल्ह्यास लागली आहे. जर हा नेता फुटला तर दिवाळीआधीच राजकीय फटाके फुटणार असल्याचंही चर्चा सुरू आहे.

गुप्त बैठकांचा सपाटा

रत्नागिरी- चिपळूण, खेड आणि आता दापोली विधानसभा मतदारसंघात भाजपने ताकद वाढण्यात जोरदार मुसंडी मारली आहे. दरम्यान आणखी काही जण महायुतीच्या वाटेवर असल्याची सध्या चर्चा आहे. सध्या दापोलीत गुप्त बैठकांचा सपाटा सुरू असून सत्ताधाऱ्यांकडून डावपेच आखले जात आहेत.

दापोली-खेड-मंडणगड विधानसभा मतदारसंघात पूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेत असलेले माजी आमदार संजय कदम यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर आता आणखी एक राजकीय भूकंप होणार असल्याचीही चर्चा आहे. संजय कदम यांच्या प्रवेशानंतर दापोली नगरपंचायतीमधील काही नगरसेवकांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता. काही नगरसेवक शिवसेनेत आले आहेत.

दरम्यान, आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दापोलीतील मोठ्या पदावर असलेला युवा नेता सध्या पक्षात अस्वस्थ असून त्याने शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांबरोबर काही गुप्त बैठका केल्याची माहिती आहे. या युवा नेत्याच्या यापूर्वीच भाजपच्या पदाधिकाऱ्यांबरोबरही काही बैठका झाल्या आहेत. मात्र भविष्यातील राजकीय वाटचाल शिवसेना की भाजप असणार, हा निर्णय अद्याप झालेला नाही.

FAQs :

प्र.1: रत्नागिरीत कोणती चर्चा सुरू आहे?
उ. भाजपने पुन्हा ऑपरेशन लोटस सुरू केल्याची चर्चा आहे.

प्र.2: शिवसेना उद्धव गटातील कोण प्रभावित झाला आहे?
उ. एका युवा नेत्याच्या भाजपकडे वळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

प्र.3: याचा भाजपला काय फायदा होणार?
उ. रत्नागिरी जिल्ह्यात भाजपची ताकद आणखी वाढेल.

प्र.4: शिवसेना उद्धव गटावर याचा काय परिणाम होईल?
उ. गटात असंतोष वाढून त्यांना राजकीय फटका बसू शकतो.

प्र.5: या घडामोडींचा आगामी निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो?
उ. भाजपला कोकणात मजबूत आघाडी मिळण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT