Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysarkarnama

Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा झटका! सांगलीतील युवासेना नेत्यावर पोलिसांची थेट तडीपारची कारवाई; तीन जिल्ह्यात बॅनही

Uddhav Thackerays Yuva Sena : सांगली जिल्ह्यात आगामी स्थानिकच्या तोंडावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. इस्लामपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ठाकरे शिवसेनेच्या युवासेनेच्या प्रमुखासह कुख्यात गुन्हेगारांवर तीन जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
Published on

Summary :

  1. सांगली जिल्ह्यात आगामी स्थानिक निवडणुकांसाठी भाजप आणि काँग्रेसने मोर्चेबांधणीला वेग दिला आहे.

  2. भाजप नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील गणेश मंडळांना भेटी देत आहेत.

  3. काँग्रेस नेते विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील बैठकांवर जोर देत आहेत.

  4. इस्लामपूर पोलिसांनी युवासेना तालुकाप्रमुख मानव गवंडी यांच्यासह कुख्यात गुन्हेगारांना तडीपार केले.

  5. या कारवाईमुळे सांगली जिल्ह्यात राजकीय आणि सामाजिक खळबळ उडाली आहे.

Sangli News : सांगली जिल्ह्यात सध्या आगामी स्थानिकची मोर्चे बांधणी केलीत आहे. भाजपचे नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील जिल्ह्यातील महत्वाच्या गणेश मंडळणाना भेटी देत आहेत. तर काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील बैठकांवर जोर देताना दिसत आहे. अशातच इस्लामपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी थेट ठाकरे शिवसेनेच्या युवासेनेच्या प्रमुखासह कुख्यात गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई केली आहे. मानव गवंडी हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या युवासेनेचा तालुकाप्रमुख आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

इस्लामपूर पोलिसांनी कुख्यात गुन्हेगार मानव गवंडी त्याच्यासह इतर पाच जणांवर तडिपारीची कारवाई केली असून त्यांना सांगली, सातारा व कोल्हापूर या तीन जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Shiv Sena: मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे सेनेची अशी आहे रणनीती

आज गणेशत्सोवाची सांगता होत असून आगामी सण तसेच स्थानिक स्वराज्य निवडणुका लक्षात घेता पोलिसांनी ही कारवाई केली आहे. याबाबत महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 55 अन्वये पोलिस निरीक्षक संजय हारुगडे यांनी प्रस्ताव तयार केला होता. ज्यानंतर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी कारवाईचे आदेश दिले होते.

पोलिसांनी, मानव गवंडी (वय 24, रा. आंबेडकर नाका, इस्लामपूर) याच्या टोळीत ओमप्रकाश मुक्ताजी बोमशेटे (वय 21, रा. खांबे मळा, इस्लामपूर) विनोद ऊर्फ बाल्या रामचंद्र माने (वय 22, रा. वडार गल्ली, इस्लामपूर), श्रीयुग ज्ञानदेव ताटे (वय 20, रा. आंबेडकर नाका, इस्लामपूर), रोशन रमेश राजपूत (वय 20, रा. क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, इस्लामपूर) या सर्वांवर तडिपारीची कारवाई केली आहे. तसेच या सर्वांना सांगली, सातारा व कोल्हापूर या तीन जिल्ह्यात न येण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

दरम्यान गवंडी टोळीविरुद्ध सन 2022 ते 2025 या कालावधीत घातक शस्त्राने जाणीवपूर्वक दुखापत करणे, शिवीगाळ, दमदाटी करण्यासह जीवे ठार मारण्याची धमकी देणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. कायद्याला न जुमानता या टोळीने अनेक गुन्हे केले आहेत.

Uddhav Thackeray
Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray - VIDEO : ''तुमचे शंभर बाप खाली उतरले तरी..'' ; बाळासाहेबांच्या कडक आवाजातून ठाकरे गटाचा भाजपला इशारा!

FAQs :

प्रश्न 1: सांगलीत पोलिसांनी कोणावर कारवाई केली?
➡️ युवासेना तालुकाप्रमुख मानव गवंडी आणि इतर कुख्यात गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई झाली.

प्रश्न 2: भाजपचे चंद्रकांत पाटील काय करत आहेत?
➡️ ते जिल्ह्यातील महत्वाच्या गणेश मंडळांना भेटी देत आहेत.

प्रश्न 3: काँग्रेस नेते कोणत्या हालचाली करत आहेत?
➡️ विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी बैठकींना जोर दिला आहे.

प्रश्न 4: या कारवाईचा राजकारणावर काय परिणाम झाला?
➡️ ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का बसला असून जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

प्रश्न 5: ही कारवाई कुठे झाली?
➡️ इस्लामपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com