Shivsena UBT Politics : गोकुळमधील भ्रष्टाचाराच्या भानगडी थांबवून मंत्री मुश्रीफांनी लेखी उत्तर द्यावे, ठाकरेंची सेना आक्रमक

Sanjay Pawar Targets Minister Hasan Mushrif Over Gokul : गोकुळची सभा उद्या होणार आहे. पण त्याआधीच विविध मुद्द्यावरून जिल्ह्यात दुधाला उकळी फुटायला सुरूवात झाली आहे.
Shivsena UBT leader Sanjay Pawar And Minister Hasan Mushrif
Shivsena UBT leader Sanjay Pawar And Minister Hasan Mushrifsarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. शिवसेना (उद्धव बाळासाहेब) चे उपनेते संजय पवार यांनी गोकुळ दूध संघातील घोटाळ्यावरून मंत्री मुश्रीफ यांच्यावर हल्ला केला.

  2. शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे वाया जात असल्याचा सवाल त्यांनी उपस्थित केला.

  3. पशुखाद्य, जाजम आणि घड्याळ घोटाळ्याचा संदर्भ देत मुश्रीफ यांनी जबाबदारी घ्यावी अशी मागणी केली.

  4. चुकीचे काम करणाऱ्यांना शिक्षा करा, मात्र योग्य काम करणाऱ्यांना पाठिंबा द्या, असे पवार म्हणाले.

  5. पत्रकार परिषदेत बोलताना पवारांनी मंत्री मुश्रीफ यांनी लेखी उत्तर द्यावे, अशी मागणी केली.

Kolhapur News : शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे कोणी खात आहे का? हे देखील गोकुळमध्ये मंत्री मुश्रीफ यांनी पाहणे महत्त्वाचे आहे. जे चांगले काम करत आहेत. त्यांची पाठ थोपटा अन् जे चुकीचे काम करत आहेत, त्यांना शिक्षा करा. मात्र चुकीच्या कामाला मंत्री मुश्रीफ हे बरोबर सांगत असतील तर त्यांनीच आता लेखी उत्तर द्यावे. कारभार चांगलाच चालला असेल तर मंत्री मुश्रीफ यांनी पुढे यायला हवं. पशुखाद्य घोटाळा झाला. त्यामुळे मंत्री मुश्रीफ यांनी गोकुळ मधल्या सर्व भानगडी थांबवाव्यात. अशा शब्दात उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी गोकुळच्या जाजम आणि घड्याळ घोटाळ्यावरून सुनावले आहे. आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

गोकुळ दूध संघातील दूध उत्पादक संस्थांसाठी 3 कोटी 74 लाखांचे जाजम व घड्याळ ज्या भेटवस्तू संस्थांना देण्यात आले होते. ही प्रक्रिया निविदा काढून देणे योग्य व कायदेशीर होते. परंतु सत्तेचा दुरुपयोग करून निविदा न काढता कोटेशन पद्धतीने कोट्यावधी रुपयांची बेकायदेशीर खरेदी केली असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने करण्यात आली होती.

Shivsena UBT leader Sanjay Pawar And Minister Hasan Mushrif
Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा झटका! सांगलीतील युवासेना नेत्यावर पोलिसांची थेट तडीपारची कारवाई; तीन जिल्ह्यात बॅनही

दूध संस्थांना भेटवस्तू देण्यास आमचा कधीही विरोध नव्हता परंतु ज्या पद्धतीने जाजम व घड्याळाची खरेदी झाली आहे. त्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा झाला असल्याचा आरोप उपनेते संजय पवार यांनी केला.

दूध उत्पादक शेतकरी यांच्या कष्टाचे व घामाच्या पैशांचा दुरुपयोग होऊन कोणीतरी डल्ला मारणे हे योग्य नाही. गोकुळ दूध संघ हा दूध उत्पादक शेतकऱ्यांचा असून तो राजकीय अड्डा बनत चालला आहे. यातूनच कधी ते मेडिटेशनसाठी सहकुटुंब फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गोवा सहल, पशुखाद्य घोटाळा, जाजम व घड्याळ खरेदी, वासाचे दूध इत्यादी मार्गाने या गोकुळच्या हंडीतील लोणी खाण्याचे काम पद्धतशीरपणे सुरू असल्याने कष्टकरी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. असेही पवार म्हणाले.

लेखापरीक्षक गोसावी यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कष्टकरी शेतकरी व गोकुळ दूध यांचे नाते डोळ्यासमोर ठेवून पारदर्शकपणे चौकशी करावी. संबंधितांकडून पैसे वसूल करण्यासंदर्भात निर्णय करावा तसेच कायदेशीर कठोर कारवाई करावी, अन्यथा चुकीचा निर्णय झाल्यास त्यांना सुद्धा जाब विचारावा लागेल असा इशारा उपनेते संजय पवार यांनी दिला.

Shivsena UBT leader Sanjay Pawar And Minister Hasan Mushrif
Shivsena UBT : "जरांगे म्हणतात शिंदे हा भला माणूस..." शिंदेंच्या खासदाराने आंदोलनाबाबत लिहिलेल्या पत्रावरून ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल

FAQs :

प्र.१: संजय पवारांनी कोणत्या घोटाळ्यांचा उल्लेख केला?
उ. पशुखाद्य, जाजम आणि घड्याळ घोटाळा.

प्र.२: संजय पवार कोणत्या पक्षाचे नेते आहेत?
उ. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना उपनेते.

प्र.३: संजय पवारांनी मंत्री मुश्रीफ यांना काय मागणी केली?
उ. गोकुळमधल्या सर्व भानगडी थांबवाव्यात आणि लेखी उत्तर द्यावे.

प्र.४: शेतकऱ्यांच्या पैशांबाबत पवारांनी काय म्हटलं?
उ. शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे कोणी खात आहे का, असा सवाल केला.

प्र.५: संजय पवार कुठे बोलले?
उ. त्यांनी पत्रकार परिषदेत हे विधान केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com