Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
कोकण

Kokan News : 'कोकण पर्यटनाची पंढरी' म्हणत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; म्हणाले,'समृद्धी' महामार्गाप्रमाणेच...

सरकारनामा ब्यूरो

Sindhudurg : सावंतवाडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 'शासन आपल्या दारी' या योजनेचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करतानाच मोठी घोषणा केली आहे. सावंतवाडीसाठी ११० कोटींचा निधी देण्यात आला असून समृध्दी महामार्गाप्रमाणेच मुंबई- सिंधुदुर्ग महामार्ग करणार असल्याची घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोकण दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी कोकणातील विकासकामं, प्रकल्प यांवर भाष्य केलं. शिंदे म्हणाले, कोकण ही पर्यटनाची पंढरी आहे. केंद्रीय योजनांचा कोकणाला लाभ मिळवून देणार आहोत. यासाठी राणेंच्या खात्याच्या योजनांना निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली.

तसेच मागच्या सरकारच्या काळात अनेक प्रकल्प थांबवले गेले असं एकनाथ शिंदे म्हणाले. मात्र, आता मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे, नागपूर-मुंबई महामार्ग(Samrudhhi Mahamarg) जसा केला तसाच प्रकारचा मुंबई-सिंधुदुर्ग रस्ता एमएसआरडीसीच्या माध्यमातून तयार करत आहोत. एमएमआरडीएच्या धर्तीवर कोकण प्राधिकरण बनवत आहोत. यामुळे कोकणाच्या विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळाल्याशिवाय राहणार नाही असेही शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी जनतेला संबोधताना मोठं वक्तव्य केलं आहे. सावंतवाडीसाठी ११० कोटींचा निधी देण्यात आला आहे. यापूर्वी कुणी दिला नसेल इतका निधी या सरकारनं दिला असंही ते म्हणाले.

केंद्राकडे मागितलेली १०० टक्के रक्कम मंजूर होते. दावोसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खुप कौतुक झालं. महाराष्ट्राला केंद्राचं संपूर्ण पाठबळ आहे. राज्यात १ लाख १४ हजार कोटींची परदेशी गुंतवणुक केली आहे. मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणुक आणणारं पहिलं राज्य आहे. तसेच MMRDA च्या धर्तीवर कोकण विकास प्राधिकरण करण्यात येणार असल्याची माहितीही शिंदे यांनी दिलं आहे.

समृद्ध कोकण(Kokan) घडवण्यासाठी आपण प्रयत्न करु,तसंच आता शासकीय कामांसाठी सतत शासनाच्या दारी खेटे मारावे लागणार नाहीत. कारण सरकार तुमचं आहे. सावंतवाडीला आम्ही अभूतपूर्व निधी दिला आहे. हे सर्वसामान्यांच सरकार आहे. कोकणात तीन क्रीडा संकुल बांधण्याचा प्रयत्न करण्यात येणार. राणे, केसरकर अनेक योजना आणत आहेत. केसरकर यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. राणेंसोबत माझी काल तीन तास बैठक पार पडली. पर्यटन वाढीसाठी लागणार निधी देणार. जगाला हेवा वाटलं असं कोकण बनवणार असल्याचा निर्धारही शिंदे यांनी बोलून दाखवला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT