Sunil Tatkare Sarkarnama
कोकण

Sunil Tatkare : तटकरेंना काँग्रेसमधील कोणत्या नेत्यांनी लोकसभेला मदत केली? तटकरेंच्या दाव्यानंतर संशयकल्लोळ!

Raigad Lok Sabha Constituency-2024 : लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीपेक्षा या वेळी मला अलिबाग मतदारसंघातून जास्तीचं मताधिक्य मला मिळालं आहे

Vijaykumar Dudhale

Alibaug, 15 June : रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार तथा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माझ्या विजयात काँग्रेस पक्षाचाही मोठा वाटा आहे, असा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे तटकरेंना काँग्रेसमधील कोणत्या नेत्याने मदत केली, असा प्रश्न चर्चिला जात आहे.

लोकसभा निवडणुकीतील यशाबद्दल जनतेचे आभार मानण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे अलिबागच्या दौऱ्यावर आले होते. त्या वेळी बोलताना त्यांनी काँग्रेसच्या (Congress) मदतीचा दावा केला आहे. ते म्हणाले, रायगड लोकसभा मतदारसंघातील (Raigad Lok Sabha Constituency) अलिबाग विधानसभा मतदारसंघात दोन-पाच हजार मतांनी मी पिछाडीवर राहीन, असं सर्वसाधारणपणे बोललं जात होतं. तशा पद्धतीचं नॅरेटिव्ह या परिसरात सेट केलं गेलं होतं.

शिवसेनेचे आमदार आमदार महेंद्र दळवी, भाजपचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसमधील काही सहकाऱ्यांनी आम्हाला केलेली मदत या सर्वांच्या बळावर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपेक्षाही या वेळी मला अलिबाग मतदारसंघातून जास्तीचं मताधिक्य मला मिळालं आहे, असा दावा सुनील तटकरे यांनी केला आहे.

सुनील तटकरे यांच्या दाव्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर दिले आहे. सुनील तटकरे हे आम्हाला काँग्रेसची मतं मिळाली, असं म्हणत असतील तर आम्हाला भाजपची मतं मिळाली, असं आम्ही म्हणायचं का?, असा सवालच नाना पटोले यांनी केला आहे.

त्या त्या भागात कोणाची मतं कुणाला भेटली. जिंकून आलं तर काही करायचं नाही. पुढचं भविष्य काय आहे, ते आपण ठरवू. पण मूळ प्रश्न हा आहे की भाजप आणि भाजपप्रणित महाराष्ट्रातील सरकार हे महाराष्ट्राच्या विरोधी आहे. महाराष्ट्रविरोधी सरकारला सत्तेतून बाहेर काढणं, हे आमचं सर्वांचं कर्तव्य आहे, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT