Nitesh Rane Case Updates  Sarkarnama
कोकण

नितेश राणेंना धक्का; स्वीय सहाय्यकाला 4 दिवसांची पोलीस कोठडी

आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या जामीन अर्जावर आज सत्र न्यायालयात फैसला होणार आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेना (Shivsena) कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) अडचणीत आले आहेत.सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयासमोर शरण येऊन राणेंनी नियमित जामिसाठी अर्ज केला आहे. त्यांना जामीन मिळणार की अटक होणार याचा फैसला आज होणार आहे. दरम्यान, त्याआधीच राणेंना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या स्वीय सहाय्यकाला न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (Nitesh Rane Case Updates)

नितेश राणेंचे स्वीय सहाय्यक राकेश परब हे काल (ता.31 जानेवारी) सकाळी कणकवली पोलिसांसमोर शरण आले होते. संतोष परब हल्ला प्रकरणात राकेश परब हे आरोपी आहेत. या प्रकरणी सचिन सातपुते याला पोलिसांनी आधीच अटक केली आहे. सातपुते यानेच संतोष परबवर हल्ला केला होता. या सातपुतेच्या संपर्कात नितेश राणे सातत्याने होते, असा पोलिसांचा आरोप आहे. राणे हे स्वीय सहाय्यक राकेश परब यांच्याच माध्यमातून सातपुतेशी संपर्क साधत होते, असाही पोलिसांचा दावा आहे.

राकेश परब यांना अटक करुन आज न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी केली होती. या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी आणि मोबाईल जप्त करण्यासाठी पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. अखेर न्यायालयाने परब यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. नितेश राणेंना हा मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्यास सर्वोच्च न्यायालयाने 10 दिवसांचा अवधी दिला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर 24 तासांतच नितेश राणे जिल्हा न्यायालयासमोर शरण आले होते. जामिनावारील सुनावणीसाठी राणे हे त्यांचे बंधू माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांच्यासमवेत काल न्यायालयात हजर झाले होते. राणेंच्या वतीने वकील सतीश मानेशिंदे यांनी बाजू मांडली. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी राणेंना अटक करण्यात यावी, असा युक्तिवाद केला होता. आज दुपारी 3 वाजता न्यायालय यावर निर्णय देणार आहे. (Nitesh Rane News)

राणे यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यांना जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्यास 10 दिवसांचा कालावधी दिला होता. मागील सुमारे महिनाभरापासून नितेश राणे गायब होते. ते नुकतेच प्रकटले असून, ते मागील काही दिवस कणकवली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजेरी लावत होते. (Nitesh Rane News Updates)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT