पोलीस म्हणतात, राणेंची अटक अत्यावश्यक; उद्या होणार फैसला

आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या जामीन अर्जावर सत्र न्यायालयात उद्या फैसला होणार आहे.
Nitesh Rane and Nilesh Rane
Nitesh Rane and Nilesh Rane Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेना (Shivsena) कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) अडचणीत आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात राणेंच्या जामिनावर आज सुनावणी झाली. ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे (Satish Maneshinde) हे त्यांच्या बाजूने मैदानात उतरले आहेत. राणेंची अटक अत्यावश्यक असल्याची भूमिका सरकारी पक्षाने घेतली असून, यावर उद्या (फेब्रुवारी) दुपारी ३ वाजता न्यायालय फैसला सुनावणार आहे. यामुळे राणेंच्या अटकेबाबत उद्याच निर्णय होणार आहे.

आमदार नितेश राणे हे सुनावणीसाठी जिल्हा न्यायालयासमोर हजर झाले आहेत. त्यांच्यासोबत बंधू माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) आणि वकील सतीश मानेशिंदे पोचले. न्यायाधीश आर. बी. रोटे यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. पोलिसांच्या वतीने विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी बाजू मांडली आहे. सुनावणीनंतर बोलताना घरत म्हणाले की, नितेश राणे यांनी शरण येताना कायदेशीर प्रक्रियेचे पालन केलेले नाही. आरोपीला न्यायालयाने ताब्यात घेतल्यानंतर ताब्यातच ठेवायला हवे. आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी व्हायला हवी. न्यायालयाच्या परवानगीशिवाय त्याला बाहेर जाण्याचा हक्क नाही. यावर न्यायालय उद्या दुपारी ३ वाजता निर्णय देणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपी सत्र न्यायालयासमोर हजर झाला म्हणजे तो न्यायालयाच्या ताब्यात आला. पुढील कार्यवाही आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर होईल. त्यामुळे आरोपीला ताब्यात घ्यावे, अशी आमची मागणी होती. न्यायालयाने यावर उद्याच निर्णय देण्याचे जाहीर केले आहे. नितेश राणे गायब होते, हा दावा त्यांचे वकील खोडून काढू शकले नाहीत. सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळेपर्यंत राणे समोर आले नव्हते. अन्यथा पोलीस त्यांना अटक करु शकत होते. तपासासाठी नितेश राणेंची अटक अत्यावश्यक आहे, असे प्रदीप घरत यांनी सांगितले.

Nitesh Rane and Nilesh Rane
मोठी घडामोड : नितेश राणेंचा स्वीय सहाय्यक कणकवली पोलिसांसमोर शरण

नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्यास सर्वोच्च न्यायालयाने 10 दिवसांचा अवधी दिला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर 24 तासांतच नितेश राणे जिल्हा न्यायालयासमोर शरण आले होते. नितेश राणे वकिलांसमवेत न्यायालयात हजर झाले होते. त्यांनी शरण येण्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियमित जामिनासाठी अर्ज केला आहे. राणेंच्या जामिनावर वकिलांनी बाजू मांडली असून, पुढील सुनावणी उद्या होणार आहे. (Nitesh Rane News)

Nitesh Rane and Nilesh Rane
पलकने तो फोन केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भय्यू महाराजांनी केली होती आत्महत्या

मागील सुमारे महिनाभरापासून नितेश राणे गायब होते. ते नुकतेच प्रकटले असून, ते मागील काही दिवस कणकवली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजेरी लावत होते. उच्च न्यायालयाने राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज 17 जानेवारीला फेटाळला होता. त्यांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी अटकेपासून संरक्षण उच्च न्यायालयाने कायम ठेवले होते. सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्याने राणे सत्र न्यायालयासमोर शरण आले. आता त्यांना अटक होणार की जामीन याचा फैसला सत्र न्यायालय घेणार आहे. (Nitesh Rane bail hearing)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com