Uddhav Thackeray  Sarkarnama
कोकण

Uddhav Thackeray : सभांना गर्दी; ठाकरेंच्या दौऱ्यान कोकणातलं वारं फिरलं

Political News: पहिल्याच या दौऱ्याला मिळालेला प्रतिसाद पाहता रायगड मतदारसंघात ठाकरे गट कडवी झुंज देणार असल्याचे चित्र आहे.

सरकारनामा ब्यूरो

Raigad News : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्रातील जनसंवाद यात्रेची सुरूवात रायगड येथून झाली आहे. उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या रायगड दौऱ्यावर आहेत. उद्यापासून ते दोन दिवस रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. मात्र, पहिल्याच दिवशी रायगड येथील पेण येथून सुरू झालेल्या या दौऱ्याला मिळालेला मोठा प्रतिसाद पाहता आता रायगड लोकसभा मतदारसंघात ठाकरे गट कडवी झुंज देणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याने विरोधकांनाही आता याचा विचार करावा लागणार आहे. त्यामुळे आता ठाकरेंच्या दौऱ्यान रायगड लोकसभा मतदारसंघातील वार फिरलं का चित्र पाहायला मिळत असल्याच मत राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केले जात आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघात अजितदादांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे खासदार आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा या जागेवर राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. ठाकरे यांच्या आजच्या दौऱ्यातून उपस्थितांचा मिळत असलेल्या प्रतिसाद पाहता आता रायगड लोकसभा मतदारसंघात ठाकरे यांनी लोकसभेच्या प्रचाराचा नारळ फोडला असून गद्दारांना आता जागा दाखवण्याचे आव्हान दिले आहे.

या सगळे दौऱ्यात शेतकरी कामगार पक्ष व काँग्रेसचे काही पदाधिकारीही सहभागी झाले होते. त्यामुळे हे सगळे चित्र पाहता रायगड लोकसभेतील महायुतीचे संभाव्य उमेदवार अजित दादांच्या राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्या अडचणी वाढणार असल्याचे चित्र ठाकरे यांच्या दौऱ्यावरून स्पष्ट झाल आहे. रायगड लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावरती संभाव्य उमेदवार अनंत गीते (Anant Gite) यांनाही उद्धव ठाकरे यांनी बळ दिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पहिल्या दिवसाच्या रायगड दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी पेण, अलिबाग, रोहा भागाचा दौरा केला आहे. पेण भाजपाचे रवीशेठ पाटील हे विद्यमान आमदार आहेत तर अलिबाग मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे महेंद्र दळवी हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांच्या आजच्या दौऱ्याने विरोधकांनाही इशारा मिळाल्याचं मानलं जातं.

(Edited by Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT