Uddhav Thackrey : उद्धव ठाकरेंच्या 'त्या' टीकेमुळे संतापले होते संयमी दीपक केसरकर

Moderate Deepak Kesarkar was angered by Uddhav Thackeray's comment : शिंदे गटाच्या आमदारावर उद्धव ठाकरे यांनी जहरी टीका केली होती. या टीकेमुळे दीपक केसरकर ही संतापले होते.
Uddhav thackrey, Deepak Kesarkar
Uddhav thackrey, Deepak Kesarkar Sarakaranama
Published on
Updated on

Political News : बुलडाण्यातून वर्षभरापूर्वी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केली होती. या दौऱ्याच्या सुरुवातीच्या पहिल्याच सभेत त्यांनी शिंदे गटाच्या आमदारावर जहरी टीका केली होती. या टीकेमुळे संयमी असलेले दीपक केसरकरही चांगलेच संतापले होते. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या या टीकेमुळे त्यांची चांगलीच अडचण झाली होती.

शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलताना दीपक केसरकर यांनी नेहमीच आपुलकीची भाषा वापरली होती. विशेषतः शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून त्यांनी कधीच बोलण्यातून कटुता व्यक्त केली नव्हती. ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणात शिंदे गटावर सडकून टीका केली होती. त्यामुळे केसरकर यांचा पारा चढलेला पाहावयास मिळाला.

Uddhav thackrey, Deepak Kesarkar
Madhya Pradesh Exit Polls : मध्य प्रदेशमध्ये होणार सत्तांतर ? भाजप, काँग्रेसमध्ये चुरशीची लढत

उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांच्या या टीकेनंतर बोलताना मंत्री दीपक केसरकर यांनी ही त्याच शब्दांत उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले होते. येत्या काळात तुम्ही अशाच प्रकारे जर आमच्यावर टीका करत असाल तर एक दिवशी आमचेही संतुलन बिघडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी उद्धव ठाकरे यांनी दिला होता. या वेळी बोलताना त्याने तुमच्याकडे फ्रिजचे खोके भरून पैसे आम्ही पाठवले होते. याचे पुरावे आमच्याकडे आहेत, आम्हीही जर त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले तर तुमची अडचण होईल, असे म्हणत त्यांना फटकारले होते.

खोके-खोके म्हणून कोणाला हिणवता. एक दिवस या आमदारांचा संयम सुटेल, त्यावेळी तुम्हाला समजेल. फ्रिजचे मोठे खोके भरून पैसे कोणाकडे गेले हे जनतेसमोर आल्याशिवाय राहणार नाही'', असं म्हणत शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) चांगलेच आक्रमक झाले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वर्षभरापूर्वी ठाकरे गटाचे पक्षनेते उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या राज्यव्यापी दौऱ्यास बुलडाणा येथून सुरुवात केली होती. येथील शेतकरी मेळाव्यातून त्यांनी शिंदेंसोबत गेलेल्या आमदार व खासदारांवर सडकून टीकाही केली होती. या सभेतून ठाकरे यांनी शिंदे गटासोबत गेलेल्या आमदारांचे अक्षरशः पिसे काढली होती. येत्या काळात प्रत्येक सभातून उद्धव ठाकरे अशा स्वरूपाची टीका करून जर त्याचा पुनरुच्चार जर वारंवार करून आमच्या संबंधित गद्दार हा शब्द वापरणार असतील तर आम्ही काय शांत बसणार नाही, अशी भूमिका या वेळी केसरकर यांनी घेतली होती.

हिंदुत्व कोणाला शिकवता

तुम्ही कोणाला गद्दार म्हणता तुम्हाला भेटायला २५ आमदार आले होते. ते तुम्हाला सांगत होते हिंदुत्वापासून दूर जायला नको, आपण कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीपासून दूर जाऊ, पण तुम्ही ऐकलं नाही. आता तर तुम्ही खोटं बोलण्याची मोहीम चालवलीय. मात्र, तुम्ही कोणाची बदनामी करता? ज्यांनी तुमच्यासाठी पूर्ण जीवन ओतलं त्यांची बदनामी करता. पण ज्या कॉंग्रेस, राष्ट्रवादीसाठी हिंदुत्व सोडलं ना त्यांना विचारा अयोध्याची रथयात्रा कोणी आडवली होती. आता हिंदुत्व कोणाला शिकवता, असं म्हणत दीपक केसरकर चांगलेच संतापले.

Uddhav thackrey, Deepak Kesarkar
Lahu Kanade News : अंगणवाडी सेविकांना सरकारी कर्मचारी घोषित करा; काँग्रेस आमदाराने उचलला विडा

शिंदे गटांसोबत गेलेल्याची झाली चांगलीच कोंडी

शिवसेनेत फूट पडल्यापासून शिंदे गट व ठाकरे गटात आडवा विस्तवही जात नाही. एकमेकांवरील आरोपाची कुठलीच संधी दोन्ही गट सोडत नाहीत. विशेषतः उद्धव ठाकरे यांनी याच सभेत शिवसेना खासदार भावना गवळी व अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्यावरही सडकून टीका केली होती. त्यांनी खासदार भावना गवळी यांच्यावर टीका करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून राखी बांधून घेतल्याचा उल्लेख केला होता. त्यामुळे त्यांची टीका त्यांच्याही चांगलीच जिव्हारी लागली होती. त्यानंतर बच्चू कडूवरही त्यांनी खालच्या शब्दांत टीका केली होती. बुलडाणा जिल्ह्यातील खासदार प्रतापराव जाधव व आमदार रायमुलकर यांच्यावरही त्यांनी सडकून टीका केली. त्यामुळे शिंदे सोबत गेलेले आमदार जरी त्यांच्या टीकेमुळे वैतागले असले तरीही त्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.

(Edited by Sachin Waghmare)

Uddhav thackrey, Deepak Kesarkar
Eknath Shinde : ...अन् मुख्यमंत्री शिंदेंनी इंग्रजीतून ठोकलं भाषण; म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com