कोरोना नंतर बंद झालेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन अद्याप सुरू करण्यात आलेली नाही.
रेल्वे मंत्र्यांनी गोरखपूर एक्सप्रेसलाच प्राधान्य दिल्यामुळे कोकणवासीयांमध्ये नाराजी आहे.
आंदोलने आणि मागण्या असूनही कोकण प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Mumbai News : पूर्वांचलमधील प्रवाशांसाठी एक मोठी पर्वणी म्हणून दादर-गोरखपूर रेल्वे सेवेला नियमित एक्सप्रेस ट्रेन म्हणून चालवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वे आणि माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गोरखपूरचे खासदार रवी किशन यांना पाठवलेल्या अधिकृत पत्रातून याला दुजोरा देण्यात आला आहे. मात्र यामुळे कोकणवासियांना मोठा धक्का बसला असून त्यांच्या हक्काची दादर रत्नागिरी पॅसेंजर रेल्वे कायमची बंद करण्यात आली आहे. याआधी ती कोरोनानंतर बंद करण्यात आली होती. या निर्णयामुळे कोकणवासियांमध्ये संतापाची लाट उसळली असून केंद्राने कोकणावर अन्याय करत यूपीला मान दिला. दादर-गोरखपूर रेल्वे सुरू करण्यासाठी दादर-रत्नागिरी पॅसेंजरवर 'वरवंटा' चालवल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून कोकणात जाण्यासाठी चाकरमानी दादर-रत्नागिरी या एकमेव पॅसेंजरचा वापर करत होते. पण कोरोना काळात ही रेल्वे अचानक बंद करण्यात आली. ज्यामुळे कोकणवासियांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला होता. तर ही गाडी सुरू होण्याची अपेक्षीत वाट पाहून नंतर कोकणवासियांनी आंदोलने केली. तसेच मध्य रेल्वेशी पत्र व्यवहारही केला होता. तसेच गाडी सुरू न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला.
पण आता पूर्वांचलमधील प्रवाशांना खूश करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने उत्तरप्रदेशला जाणारी गोरखपूर एक्सप्रेस सूरू केली. त्यामुळे मुंबईसह उपनगरातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा झटका बसला होता. तर कोकणवासियांच्या लढ्याकडे दुर्लक्ष करत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दादरवरून गोरखपूर एक्सप्रेसलाच हिरवा कंदिल दिला आहे. ज्यानंतर आता कोकणवासियांमध्ये संतापाची लाट उसळली असून मुंबईसह उपनगरात राहणाऱ्या कोकणवासियांवर मोठा अन्याय केल्याची भावना तयार झाली आहे.
दरम्यान, जनतेची सोय लक्षात घेऊन विशेष गाडी क्रमांक 01027/01028 च्या नियमित संचालनास मंजुरी देण्यात आली आहे. ही गाडी आता गाडी क्रमांक 11047/11048 दादर-गोरखपूर एक्सप्रेस म्हणून धावणार आहे. हा निर्णय दीर्घकाळापासूनची जनतेची मागणी आणि प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन घेण्यात आल्याचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे.
तसेच त्यांनी असेही स्पष्ट केले आहे की, दादर-गोरखपूर मार्गावरून मोठ्या संख्येने स्थलांतरित कामगार, व्यावसायिक, विद्यार्थी आणि इतर प्रवासी नियमितपणे प्रवास करतात. या गाडीला नियमित एक्सप्रेसचा दर्जा मिळाल्याने प्रवास अधिक सुलभ, सोयीस्कर आणि आश्वासक होईल.
एकीकडे या निर्णयामुळे कोकणवासियांमध्ये संतापाची लाट उसळली असतानाच आता दुसरीकडे माजी माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी देखील या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. सुरेश प्रभु यांनी याबाबत एक्सवर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. त्यांनी, या गाडीमुळे कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड गैरसोय होत आहे. कारण या प्रवाशांपैकी बहुतांश जण कामगार वर्गातील असून, ते कोकणातील आहेत. यामुळे रेल्वे मंत्र्यांनी यात तात्काळ सुधारणा करावी अशी मागणी केली आहे.
1. दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन का सुरू झाली नाही?
कोरोनानंतर ती बंद करण्यात आली आणि अद्याप सुरू करण्यात आलेली नाही.
2. कोणती ट्रेन सुरू करण्यात आली आहे?
दादर-गोरखपूर एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात आली आहे.
3. कोकणवासीयांची प्रतिक्रिया काय आहे?
त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून आंदोलने केली आहेत.
4. रेल्वे मंत्र्यांनी काय निर्णय घेतला?
गोरखपूर एक्सप्रेसला परवानगी देण्यात आली आहे.
5. याचा प्रवाशांवर काय परिणाम झाला आहे?
कोकणातील प्रवाशांना प्रवासात मोठ्या अडचणी येत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.