रत्नागिरी : दाऊद हा देशाचा एक नंबरचा शत्रू आहे. बॉम्बस्फोट घडविणाऱ्यांकडून तुम्ही जमिनी खरेदी करता, या एका प्रकरणात सरदार पटेल फ्रंट मॅन असू शकतो. पण, दाऊदचा खरा फ्रंटमॅन नवाब मलिक असू शकतो, असा खळबळजनक आरोप माजी खासदार व भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी केला आहे.
निलेश राणे यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री नवाब मलिकप्रकरणी राष्ट्रवादीवर निशाणा साधत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. (Nilesh Rane vs Nawab Malik News Update)
निलेश राणे म्हणाले, ''दाऊदच्या माणसाकडून जमीन खरेदी करता ते ही कवडीमोल भावाने, त्यात ब्लॅकमनीचा वापर झाला आहे. त्यामुळेच याचा ट्रेंड ईडी घेत आहे. दाऊद हा देशाचा एक नंबरचा शत्रू आहे. बॉम्ब स्फोट घडविणाऱ्यांकडून तुम्ही जमिनी खरेदी करता, या एका प्रकरणात सरदार पटेल फ्रंट मॅन असू शकतो.''
पण, दाऊदचा खरा फ्रंट मॅन नवाब मलिक असू शकतो. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निषाणा साधताना निलेश राणे म्हणाले, शरद पवार हे गंभीर विषयावर बोलत नाहीत. नबाव मलिक यांच्यासाठी राष्ट्रवादी रस्त्यावर उतरते. नबाव मलिकांचे हे प्रकरण गंभीर असून देशाच्या संरक्षणासाठी हे प्रकरण धोकादायक आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने मलिकांचा राजीनामा घ्यायला पाहिजे. पवार साहेबांनी अशा लोकांना पक्षात ठेऊ नये.
दाऊदचा माणुस पवारांना चालतो. युक्रेनसाठी भाजपच्या नेत्यांना फोन लावता पण, या प्रकरणावर ते काहीही बोलत नाहीत, असा खोचक टोला राणेंनी श्री. पवार यांना लगावला. खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना राणे म्हणाले, ''नबाव मलिक यांना अटक झाल्यावर त्यांच्या प्रकृतीची काळजी सुप्रिया सुळे यांना होती. त्यानंतर हे प्रकरण गंभीर आहे हे लक्षात आल्यावर त्यांच्या टविट्वर काल कुठल्या बागेत फुलांची पहाणी करत होत्या,'' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
नवाब मलिक यांच्या प्रकृतीची काळजी वाटत होती. त्याच्याच दुसऱ्या दिवशी प्राणी संग्रहालयात फुलांची आणि प्राण्यांची पाहणी करत होत्या. यातूनच सर्व प्रकार लक्षात येतो. त्यामुळे त्यांना याचे गार्भिय कळले असावे, असा टोला ही त्यांनी खासदार सुळे यांना लगावला. तर अजित पवार या विषयात काही बोलत नाहीत ते शांत आहेत. अशा प्रकरणात ते बोलत नाहीत ते आत्मक्लेश करतात, असा टोला त्यांनी अजित पवार यांना लगावला.
संजय राऊत ढेपाळलेत...
शिवसेना अनेक विषयात साईड ट्रॅक होतेय आणि अनेक विषयात अडचणीत आली आहे. अजून अनेक विषयांवर शिवसेना साईड ट्रॅक झालीय हे शिवसेनेलाच कळलं नाही. तर, राष्ट्रवादीला सुद्धा मलिक हे दाऊदचा माणुस आहे, हे कळलंय. संजय राऊत ढेपाळले असून आता ते धड बोलू शकत नाहीत, अशी त्यांची अवस्था झालीय, अशी टीका निलेश राणें यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.