युक्रेन राष्ट्राध्यक्षांची पत्नी रणांगणात; भावनिक पोस्टनं वेधलं जगाचं लक्ष

रशिया आणि युक्रेनमधील युध्दात शेकडो नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा युक्रेनकडून केला जात आहे. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.
Olena Zelenska and Volodomyr Zelenskyy
Olena Zelenska and Volodomyr ZelenskyySarkarnama

कीव : रशिया आणि युक्रेनमधील युध्दात शेकडो नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा युक्रेनकडून केला जात आहे. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. अनेक नागरिक जीव वाचवण्यासाठी बंकरमध्ये थांबले आहेत. राष्ट्राध्यक्ष वोल्डोयोमीर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) हेही सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना धीर देत आहेत. आता त्यांची पत्नी ओलेना झेलेन्स्का (Olena Zelenska) याही मैदानात उतरल्या आहेत.

ओलेना या पतीसोबत युक्रेनची (Ukraine) राजधानी कीवमध्ये एका बंकरमध्ये आहेत. या बंकरमध्येच एका बालकाचा जन्म झाला आहे. या नवजात बाळाचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत ओलेना यांनी युक्रेनमधील नागरिकांना आश्वस्त तर केले आहेत पण जगाचेही लक्ष वेधून घेतलं आहे. हा मुलं कीवमधील एका बंकरमध्ये जन्माला आले आहे. त्याचा जन्म शांतीपूर्ण वातावरणात आणि वेगळ्या ठिकाणी होणार होता. या मुलानं शांत वातावरणच पाहायला हवं होतं, असं ओलेना यांनी म्हटलं आहे. (Russia-Ukraine War Update)

Olena Zelenska and Volodomyr Zelenskyy
मंगळावर असला तरी परत आणू! विद्यार्थी युध्दभूमीत अन् केंद्रीय मंत्र्यांची फुशारकी

त्या पुढे म्हणतात की, पण महत्वाची बाब ही आहे की, युध्द सुरू असून आमच्या रस्त्यांवर मुलाच्या बाजूला डॉक्टर आणि देखभाल करणारे लोक आहेत. तुझं संरक्षण केलं जाईल. कारण तु अविश्वसनीय आहेत. युक्रेनी नागरिक केवळ दोन दिवसांतच रशियाच्या (Russia) हल्ल्याविरोधात उभे राहिले आहेत. एवढेच नाही तर ते एकमेकांच्या मदतीसाठीही वेळ देत आहेत.

Olena Zelenska and Volodomyr Zelenskyy
Russia-Ukraine War : पंतप्रधान मोदी चार केंद्रीय मंत्र्यांना पाठवणार युक्रेन मोहिमेवर

युक्रेनी नागरिकांनी त्यांच्या शेजारच्यांची मदत केली. गरजू लोकांना आपल्या घरांमध्ये आसरा दिला. सैन्य आणि पीडित लोकांसाठी रक्तदान केलं. शत्रूच्या वाहनांची माहितीही दिली, असं लिहित ओलेना यांनी म्हटलं की, बंकरमध्ये जन्मलेली मुलं एका शांतीपूर्ण देशातच राहतील, ज्याने आपला चांगल्याप्रकारे बचाव केला आहे, असं म्हणत ओलेना यांनी आपल्या पोस्टचा शेवट केला आहे. रविवारी केलेली ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाली आहे.

दरम्यान, राष्ट्राध्यक्ष वोल्डोयोमीर झेलेन्स्की यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटलं होतं की, रशियाने आपल्याला क्रमांक एकचं तर आपल्या कुटुंबाला क्रमांक दोनचं शत्रु बनवलं आहे. तसेच तिथून बाहेर पडण्यासाठी त्यांनी अमेरिकेची ऑफरही धुडकावली आहे. ते आपल्या कुटुंबासह एका बंकरमध्ये थांबले आहेत. तिथूनच ते रशियाविरुध्द सुरू असलेल्या युध्दाची माहिती घेत आहेत. त्यांच्या पत्नीही त्यांना या लढ्यात साथ देत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com