मुंबई : 'ऑपरेशन गंगा' (Operation Ganga) अंतर्गत आज सकाळी युक्रेनमधील (Ukraine) भारतीयांना घेऊन सातवे विमान रोमानियातील बुखारेस्ट येथून मुंबईत (Mumbai) दाखल झाले. या विमानातून युक्रेनमध्ये अडकलेले १८२ भारतीय मायदेशी परतले. यावेळी केंद्र सरकारचे प्रतिनिधी या नात्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी विमानतळावर देशवासीयांचे स्वागत केले आणि विद्यार्थ्यांना दिलासा दिला. या वेळीही राणेंनी शिवसेनेवर (Shivsena) टीका करण्याची संधी सोडली नाही. त्यांनी युक्रेनमधील भारतीयांना परत आणण्यावरून शिवसेनेला डिवचले आहे.
राणेंनी शिवसेनेसोबत आणि खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना संजय राऊतांनी कधीही चांगलं म्हटलं नाही. युक्रेनहून भारतीयांना आणण्याची मोहीम शिवसेनेनं सुरू केलीय का? हा माणूस शुद्धीत असतो का? भारत सरकारने चार मंत्र्यांची नेमणूक केलीय. सरकारनं मलाही इथे पाठवलं. लक्ष नाय काय म्हणता. या माणसाला टीका करण्याशिवाय दुसरं काही काम नाही.
राणे म्हणाले की, मी विमानात जावून सर्वांना भेटलो. हे विद्यार्थी अतिशय भयभीत अवस्थेमध्ये होते. मी त्यांना सांगितले की तुम्ही भारतात सुखरुप पोहचले आहात. त्यामुळे कोणीही घाबरुन जाण्याचे कारण नाही. तेव्हा त्यांच्या जीवात जीव आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ऑपरेशन गंगा व्यवस्थित चालू आहे. मात्र अजून भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारमधील ४ मंत्र्यांची नेमणूक करण्यात आली असल्याचेही माहिती राणे यांनी दिली.
रशिया-युक्रेन युद्धाचा सहावा दिवस
दरम्यान, युक्रेन-रशियामधील युद्धाचा आजचा सहावा दिवस आहे. या दोन्ही उभय देशांमध्ये काल बेलारुस याठिकाणी शांतता चर्चेची पहिली फेरी पार पडली. पण, युद्ध काही अद्याप सुरुच आहे. रशियाने पाचव्या दिवशी ५६ रॉकेट आणि ११३ क्रूझ क्षेपणास्त्र डागले, अशी माहिती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी दिली. (Russia-Ukraine War Updates)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.