Deepak kesarkar  sarkarnama
कोकण

Deepak Kesarkar Won : राजन तेलींना धक्का, दीपक केसरकर विजयी

Shivsena Deepak kesarkar Won sawantwadi Assembly Election 2024: राजन तेली यांनी निवडणुकीच्या आधीपासूनच दीपक केसरकर यांच्या विरोधता मोर्चाबांधणी केली होती. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे निश्चित होते.

Roshan More

Sawantwadi Assembly Election 2024: सावंतवाडी मतदारसंघामध्ये मंत्री दीपक केसकर विरुद्ध राजन तेली अशी लढत झाली. तर, भाजपमधील अर्चना घारे यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मात्र, राजन तेली यांचा पराभव करत दीपक केसकर यांनी विजय मिळवला आहे.

शिवसेनेतील फूटीनंतर दीपक केसरकर यांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली. त्यामुळे दीपक केसरकर यांच्या विरोधात उद्धव ठाकरे तगडा उमेदवाराच्या शोधात होते. भाजपमध्ये असलेले राजन तेली यांनी उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या आधी प्रवेश देत तिकीट दिले होते.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल Latest Update

राजन तेली हे नारायण राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून परिचित होते. राणे यांचा केसरकरांना नेहमीच विरोध राहिला आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत केसरकरांनी नारायण राणे यांचे प्रामाणिकपणे काम केल्याचे दिसले. शिवाय उद्धव ठाकरेंचा उमेदवार निवडून येणे राणेंसाठी चांगले संकेत नसल्याने त्यांनी दीपक केसकरांना साथ दिली.

महाराष्ट्रातील निकालाची प्रत्येक घडामोड - येथे क्लिक करा...

राजन तेली यांनी निवडणुकीच्या आधीपासूनच दीपक केसरकर यांच्या विरोधता मोर्चाबांधणी केली होती. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे निश्चित होते. राजन तेली यांना 2019 च्या निवडणुकीत दीपक केसरकरांकडून पराभव स्वीकारावा लागला होता. यंदाच्या निवडणुकीत भाजपमधील अर्चना घारे यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होत्या.

महाराष्ट्रातील निकालाची प्रत्येक घडामोड - येथे क्लिक करा...

2019 च्या निवडणुकीचा निकाल काय?

2019 च्या निवडणुकीमध्ये दीपक केसरकर हे शिवसेनेकडून तर, राजन तेली भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीमध्ये दीपक केसरकर यांनी राजन तेली यांचा 13 हजार 228 मतांनी पराभव केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT