Kothrud Assembly 2024 Result: चंद्रकांत पाटील रेकॉर्ड मोडणार? कोथरूडमधून विजयी आघाडी!

Chandrakant Patil breaking records in Kothrud assembly elections: शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून माजी गटनेते पृथ्वीराज सुतार आणि माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्यामध्ये तिकिटासाठी स्पर्धा होती. त्याचबरोबर ऐनवेळी भाजपमधील नाराजीचा फायदा घेऊन उमेदवार बदलला जाऊ शकतो, अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत होती.
Kothrud Vidhan Sabha Constituency 2024
Kothrud Vidhan Sabha Constituency 2024Sarkarnama
Published on
Updated on

Pune News: कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी तब्बल 44 हजराहून आधीची आघाडी घेतली आहे. यानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून फटाके फोडण्यात आले. पेढे भरून चंद्रकांत पाटलांचे अभिनंदन करण्यात आले.

महाराष्ट्रातील निकालाची प्रत्येक घडामोड - येथे क्लिक करा...

मतदानानंतर चंद्रकांत पाटील यांनी आपण मोठ्या मताधिक्यांनी विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. यावेळेस त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये कोथरूड विधानसभा मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ यांना मिळालेलं 74हजार 600 मतांच्या लीडवरून अधिक लीड घेणार असल्याचे सांगितलं होतं. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना किती लीड मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये यंदा तिरंगी लढत पाहायला मिळाली. भाजपने विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा रिंगणात उतरवलं होतं. तर त्यांच्या विरोधात 2019 ला प्रतिस्पर्धी असलेले मनसेचे किशोर शिंदे पुन्हा एकदा मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं. सोबतच ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे कोथरूडच्या निवडणुकीमध्ये रंगत आली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल Latest Update

Kothrud Vidhan Sabha Constituency 2024
Jalgaon City Vidhan Sabha 2024 Result: जळगाव शहर मतदारसंघात सुरेश भोळे आघाडीवर ; हॅट्रिक मारणार?

गेल्या काही वर्षांपासून कोथरूड विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला झाल्याचं पाहायला मिळाला आहे. या विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात भाजपाला मानणारा वर्ग आहे. त्यामुळे निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच या विधानसभा मतदारसंघात भाजपचं पारडं काहीच जड असल्यास बोललं जात होतं. त्यामुळे त्यांच्या विरोधात नेमकं महाविकास आघाडी कोणाला मैदानात उतरवणार याबाबत मोठ्या प्रमाणात उत्सुकता होते.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून माजी गटनेते पृथ्वीराज सुतार आणि माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्यामध्ये तिकिटासाठी स्पर्धा होती. त्याचबरोबर ऐनवेळी भाजपमधील नाराजीचा फायदा घेऊन उमेदवार बदलला जाऊ शकतो, अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र अखेर ठाकरेंच्या शिवसेनेने चंद्रकांत मोकाटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. यानंतर या निवडणुकीमध्ये स्थानिक आणि बाहेरचा मुद्दा करण्याचा देखील प्रयत्न महाविकास आघाडीकडून करण्यात आल्याचे पाहायला मिळालं.

नव्या फेरी अखेर 44 हजारांचं लीड

कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपचे दोन विद्यमान खासदार आहेत. एकीकडे पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ तर दुसरीकडे राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी याच विधानसभा मतदारसंघातून येत असल्याने या दोन्ही खासदारांसाठी ही विधानसभेची निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती.

एकीकडे केंद्रीय मंत्री दुसरीकडे राज्यातील कॅबिनेट मंत्री आणि राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी या विधानसभा मतदारसंघामध्ये जोरदार मोर्चे बांधणी केली. दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून या विधानसभा मतदारसंघात संजय राऊत यांनी प्रचार सभा घेऊन वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. या विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे देखील सभा घेणार असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र प्रचाराच्या शेवटपर्यंत या विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांची प्रचार सभा झाली नाही.

या विधानसभा मतदारसंघातून लोकसभेला मुरलीधर मोहोळ यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळालं होतं. त्याहून अधिक मताधिक्य मिळवण्याचा प्रयत्न यंदा चंद्रकांत पाटील यांच्याकडून बोलून दाखवण्यात आला होता. त्या दृष्टिकोनातून चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रात इतरत्र जास्त दौरे न करता फक्त कोथरूडमध्येच आपली पूर्ण ताकद लावली. आता चंद्रकांत पाटील नव्या फेरी अखेर 44 हजार 881 मतांनी आघाडीवर असून आघाडीमध्ये चंद्रकांत पाटील लाखाचा टप्पा ओलांडणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com