Deepak Kesarkar Latest News Sarkarnama
कोकण

Deepak Kesarkar : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या वादात दीपक केसरकरांचं मोठं विधान, म्हणाले...

Ratnagiri-Sindhudurg Constituency : जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त विधान आणि रोहित पवारांवरील ईडीची कारवाई यावरही दिली आहे प्रतिक्रिया

सरकारनामा ब्युरो

Loksabha Election : कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा सध्या चर्चेत आला आहे. शिवसेना व भाजपाकडून या मतदारसंघावरती दावा करण्यात आला आहे. आता या सगळ्या वादात दीपक केसरकर यांनीही मोठ विधान केलं आहे.

'किरण सामंत जर का या मतदारसंघातून तयारी करत असतील तर त्यांचं काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही.', असे विधान दीपक केसरकर(Deepak Kesarkar) यांनी केलं आहे. तसेच 'ही जागा कायम शिवसेनेकडे राहीली आहे, त्यामुळे किरण सामंतांना ही जागा मिळाली तर ती परंपरा कायम राहील. राणे जेष्ठ आहेत त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय या जागेचा निर्णय होणार नाही.' असंही केसरकर यांनी यावेळी म्हटलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याचबरोबर 'युती म्हणून आम्ही ठामपणे एकत्र आहोत. वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील त्याच्याशी बांधिलकी आहे. निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे किरण सामंत यांनी जर तयारी सुरू केली असेल तर ती चुकीची आहे असं मला वाटत नाही. आमचे पूर्वीचे खासदार (निलेश राणे Nilesh Rane) कुडाळमधून आमदारकीची तयारी करत आहेत. त्यामुळे खासदारकीची ही जागा रिक्त आहे. मला खात्री आहे की, जो उमेदवार असेल त्याच्या पाठीशी राणेंचे आशीर्वाद असतील आणि आम्ही सर्वजण त्याला निवडून आणू.' अशी भूमिका शिवसेनेचे मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी मांडली आहे.

जितेंद्र आव्हाडांवर टीका -

जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनी केलेल्या वक्तव्याचाही केसरकर यांनी यावेळी समाचार घेतला. 'काही लोक प्रसिद्धीसाठी काहीही करत असतात. भारताची एक परंपरा राहिली आहे की, प्रत्येक धर्माचा सन्मान करण्याची, ती परंपरा पाळायची नाही आणि नंतर दिलगिरी व्यक्त करायची. याला काहीही अर्थ नाही. स्वत:ला प्रसिध्दी मिळवण्यासाठी तुम्ही विद्वेष पसरवणार असाल तर त्यावर कारवाई होणार. पोलीस योग्य तो अभ्यास करून निर्णय घेतील.'

रोहित पवारांबाबत काय म्हणाले ? -

याशिवाय 'आपली बाजू सत्याची असेल तर कोणालाच घाबरायची कारण नाही. ईडीचे जे काही म्हणणे असेल ते कोर्टासमोर मांडले जाईल आणि त्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार पुढील कारवाई होईल. त्यामुळे रोहित पवारांकडे(Rohit Pawar) काही असेल तर कारवाई होईल.' असं म्हणत रोहित पवारांबाबतही प्रतिक्रिया दिली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT