Sindhudurg Crime News : सावंतवाडी शहरातील सौ. प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरणाने खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणानंतर राजकीय वातावरण ठवळून निघाले आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी यावरून गंभीर आरोप करताना प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरणात देवगडच्या माजी नगराध्यक्षा प्रणाली माने यांचे पती मिलिंद आनंदराव माने (वय 48) याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तसेच नणंद तथा माजी नगराध्यक्षा आणि विद्यमान नगसेविका असणाऱ्या प्रणाली मानेंसह मुलास तात्काळ अटक न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. यानंतर आता देवगड पोलीसांनी प्रणाली माने यांचे पती मिलिंद आनंदराव माने (वय 48) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांना ताब्यात घेतलं आहे. पण प्रकृती अस्थिर झाल्याने येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान प्रणाली माने यांच्यांसह मुलगा आर्य माने यांना न्यायालयाने दिलासा देताना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. (In the shocking Sawantwadi suicide case of Priya Chavan, police have booked Milind Mane, husband of former Devgad municipal chief Pranali Mane)
शहरातील माठेवाडा निर्माण प्लाझा येथील नवविवाहीता सौ. प्रिया पराग चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात जिल्ह्यात राजकीय वातावरण तापल्यानंतर आता पोलिसांनी पती मिलिंद आनंदराव माने (वय 48) याचाही सहभाग असल्याचे तपासात समोर येताच गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांना ताब्यात घेतलं आहे. पण त्यांची तब्बेत बिघडल्यानंतर त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर उपचारानंतर अटकेची कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली आहे.
प्रिया चव्हाण हिने शुक्रवारी (ता. 4) त्यांच्या फ्लॅटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. या प्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्यात देवगडच्या माजी नगराध्यक्ष तथा नगरसेविका प्रणाली माने व तिचा मुलगा आर्य यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात नणंद तथा माजी नगराध्यक्षा आणि विद्यमान नगसेविका असणाऱ्या प्रणाली मानेंसह मुलगा आर्य आणि पती मिलिंद यांनी दबाव टाकला होता. प्रिया हिला आत्महत्येस प्रवृत्त केले होते हे आता तपासात उघड झाले आहे.
यानंतर पोलिसांनी या प्रकरणात पती मिलिंद यांना सहआरोपी केल्याची माहिती पोलिस निरीक्षक चव्हाण यांनी दिली आहे. दरम्यान जिल्हा न्यायालयाने प्रणाली माने व त्यांचा मुलगा आर्य माने यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. आता पुढील सुनावणी शुक्रवारी (ता. 11) होणार आहे. तर तपासात सहकार्य करावे, तसेच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पुराव्यात ढवळाढवळ करू नये, असे आदेश सत्र न्यायालयाने दिले आहेत.
दरम्यान ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी न्याय मिळेपर्यंत प्रिया चव्हाण कुटुबीयांसोबत राहू, भाजप आणि राणे ‘हितचिंतकां’च्या धमक्यांना घाबरत नाही, असे म्हटलं आहे. यामुळे येथील राजकारण आता पुन्हा तापण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.