
Sindhudurg News : सिंधुदुर्गमधील कुडाळ तालुक्यातील चेंदवण नाईकवाडी येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश अंकुश बिडवलकर हत्याप्रकरणामुळे पुन्हा एकदा बीडमधील हत्या प्रकरणाची चर्चा होत आहे. कारण बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांची जशी अपहरणकरून मारहाण करून हत्या करण्यात आली होती. त्याहीपेक्षा निघृण हत्या बिडवलकर याची करण्यात आल्याचे आता तपासात समोर आले आहे. यावरून आता कोकणासह राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. तर कोकणात शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह आमदार निलेश राणे यांच्यांवर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांमुळे आता जिल्ह्यात आरोप-प्रत्यारोपांची राळ उडाली आहे.
सिद्धिविनायक उर्फ प्रकाश अंकुश बिडवलकर याची हत्या दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 2023 साली करण्यात आली होती. तर हत्याही अपहरण करून झाली होती. ही हत्या पैशाच्या वादातून झाल्याचेही आता समोर आले आहे. तब्बल दोन वर्षांनी पोलिसांनी या घटनेचा उलघडा केला असून तब्बल दोन वर्षांनी पोलिसांनी या घटनेचा उलघडा केला आहे. याला ठार मारून सातार्डा येथील स्मशानभूमीत त्याला जाळण्यात आल्याचेही आता समोर आले आहे. या प्रकरणी कुडाळ येथील सिद्धेश अशोक शिरसाट, माणगाव येथील गणेश कृष्णा नार्वेकर, सातार्डा येथील सर्वेश भास्कर केरकर आणि कुडाळ येथील अमोल श्रीरंग शिरसाट यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांची रवानगी पोलीस कोठडी झाली आहे.
सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर हा सिद्धेश शिरसाट याच्याजवळ कामाला होता. तो सिद्धेश शिरसाट आणि गणेश नार्वेकर याचे पैसे देणे लागत होता. या रागातून या सर्वांनी 2023 मध्ये चेंदवण येथून बिडवलकर याचे अपहरण केलं. त्याला कुडाळ येथील शिरसाट यांच्या खोली आणत नग्न करून मारहाण केली.
याच मारहाणीत तो गंभीर जखमी झाला होता. दरम्यान तो जमिनीवर पडल्यानंतर हे चौघ जेवणासाठी बाहेर पडले. तर आल्यानंतर जेव्हा बिडवलकरला उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो मृत झाल्याचे शिरसाट यांच्या लक्षात आले. तेंव्हा चौघांचीही पाचावर धारण बसली. त्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह घेऊन त्यांनी सातार्डा गाठलं.
येथील जंगलात असणाऱ्या स्मशानभूमीत नेऊन त्याचा मृतदेह जाळला. तसेच मृतदेहाची राख आणि उरलेली हाडं जवळच्या नदीमध्ये टाकून देवून कुडाळला आरोपी परतले. यानंतर आता या प्रकरणी चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून संशयित आरोपींनी हत्या केल्याची कबुली दिली आहे. या कबुलीवरुन पोलिसांनी हत्येचा कट, पुरावा नष्ट करणेबाबत चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान आता या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत असून आरोपी सिद्धेश शिरसाट याचा मोबाईल अद्याप मिळालेला नाही. तर या हत्याप्रकरणात दोन गाड्यांचा वापर झाल्याची माहितीही समोर आली आहे. ही माहिती पोलिसांनी केलेल्या तापासातून समोर आली आहे. सध्या पोलिसांनी एक वाहन ताब्यात घेतलं असून वाहनाच्या मालकाची कसून चौकशी पोलिसांनी केली आहे.
या प्रकरणातील एक गाडी इर्टिका होती. जी कुडाळमधील इम्रान ईस्मान शेख याची असल्याचे समोर आले आहे. तर चौकशीत ती गाडी सिद्धेश शिरसाट याच्याच सांगण्यावरून विना चालक या तत्वावर दिली होती. तर कारण कोणतेही सांगितले नसल्याचे समोर आले आहे. या पोटी इम्रान शेखला शिरसाट याने 2200 रूपये दिले होते. पण हत्या झाल्याचे त्याला शेवटपर्यंत माहित नव्हते. आता पोलिस दुसऱ्या गाडीचा शोध घेतायतं
या प्रकरणी सिद्धेश शिरसाट, गणेश नार्वेकर, सर्वेश केरकर आणि अमोल शिरसाट यांना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली होती. आता यात वाढ करण्यात आली असून सिद्धेश शिरसाट अमोल शिरसाट यांना 24 एप्रिलपर्यंत तर गणेश नार्वेकर आणि सर्वेश केरकर यांना 28 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. पण मुख्य आरोपी सिद्धेश शिरसाट याच्यावर आजारी असल्याने कोल्हापूर येथे उपचार सुरू होते. आता त्याची रवानगी सावंतवाडीच्या कारागृहात झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.