Eknath Shinde- Ramdas Kadam News Sarkarnama
कोकण

Eknath Shinde News: रामदासभाईंचा भाजपला इशारा, तर मुख्यमंत्र्यांचा आमदार कदमांच्या दापोलीत विकासकामांचा धडाका

सरकारनामा ब्यूरो

Kokan News : लोकसभेच्या निवडणुका रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या लोकसभा मतदारसंघांवरून शिवसेना-भाजपमध्ये सुरू असलेले रणकंदन, रामदास कदमांनी केलेली जहरी टीका, या पार्श्वभूमीवर होत असलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोकण दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. शिंदे लोकसभेच्या जागावाटप आणि शिवसेनेचा शिंदे गट व भाजपमध्ये सुरू असलेल्या रणकंदनावर काय बोलतात, याकडे अवघ्या कोकणचे लक्ष लागले आहे.

दापोली येथील विकासकामांच्या भूमिपूजनास मुख्यमंत्री येत आहेत. या वेळी आझाद मैदानात मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे. शनिवारी दुपारी दीड वाजता ही जाहीर सभा होणार आहे, त्यांच्या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. शिवसेनेच्या शिंदे गटातील रामदास कदम (Ramdas Kadam) एक महत्त्वाचे व एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात.

याच पार्श्वभूमीवर रामदासभाई कदम यांनी लोकसभेच्या जागावाटपावरून भाजपवर डागलेली तोफ या सगळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नेत्यांना भूमिका घ्यायला लावली अथवा कसे यावर मुख्यमंत्री काय बोलणार हे पाहणं सगळ्यात महत्त्वाच्या ठरणार आहे.

दापोली मंडळ खेळ विधानसभेचे विद्यमान आमदार योगेश कदम यांच्या विरोधात मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने विरोधात काम केले होते. आताही महायुती असतानाही तेच सुरू आहे, असा थेट आरोप रामदास कदम व योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी केला आहे. या सगळ्या अंतर्गत वादावर मुख्यमंत्री अथवा महायुतीचे नेते कोणत्या तोडगा काढणार का हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आमदार योगेश कदम म्हणाले, राज्यात महायुतीचे सरकार राज्यात आल्यानंतर मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दापोली मतदारसंघातील ज्या प्रमुख काही महत्त्वाच्या प्रकल्पांना चालना देण्याची विनंती केली होती. त्यापैकी ऐतिहासिक वारसा असलेल्या महत्त्वाचे असलेले हर्णे बंदर आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यासाठी २०५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

तर दापोली उपजिल्हा रुग्णालय परिसरात १०० खाटांचे नवीन रुग्णालय ज्यामध्ये अतिदक्षता विभाग, रक्तपेढी, डायलिसिस सेंटर आदी सुविधा उपलब्ध असतील त्यासाठी २० कोटी २१ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. खेड ते दापोली या प्रमुख राज्य मार्गासाठी ९८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, या कोकण फाटा ते विसापूर रस्त्यासाठी ३५ कोटींचा निधी मंजूर झाला असल्याचे कदम यांनी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT