Loksabha Election 2024 : राज्यात लोकसभेचा जागावाटपाचा घोळ मिटता- मिटेना अशी परिस्थिती आहे. महायुती असो की महाविकास आघाडी यांच्यात चढाओढ सुरू असून, मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. पुढील दोन दिवसांत जागावाटपाचा तिढा मिटून उमेदवार जाहीर होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी सातारा जिल्हा दाैऱ्यावर येणार आहेत. या दाैऱ्यात जावळी आणि पाटण तालुक्यात ते जाणार असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाैऱ्याला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्व आहे. सातारा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा असून, महायुतीतून जागा सोडावी, अशी वारंवारं मागणी इच्छुक उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांच्याकडून केली जात आहे. या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात चढाओढ असल्याचे पहायला मिळत आहे. लोकसभा मतदारसंघात भाजपचे - 2, शिवसेना (शिंदे) - 2 आणि अजित पवार गट- 1 तर शरदचंद्र पवार गटाचे - 1 आमदार आहेत.
तरीही भाजपची ताकद वाढलेली असल्याने अशातच इच्छुक उमेदवार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना 2019 च्या पोटनिवडणुकीतील वचपा काढायचा आहे. यासाठी त्यांनी तयारी सुरू केली, तर 1999 पासून सातारा लोकसभेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले असल्याने महायुतीत चढाओढ पाहायला मिळत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महायुतीत शिवसेना शिंदे गटाचे दोन आमदार असल्याने शनिवारी दाैऱ्यावर स्थानिक पदाधिकारी नक्की काय मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार ते पाहावे लागेल. तसेच लोकसभा निवडणुकीविषयीही चर्चा होणार हे निश्चित आहे. इच्छुक उमेदवार पुरुषोत्तम जाधव नक्की काय भूमिका मांडणार आणि मुख्यमंत्री त्यांना काय शब्द देणार, याकडे शिवसैनिकांचे लक्ष आहे.
मुख्यमंत्र्यांचा दाैरा कशासाठी
सातारा जिल्ह्यातील मौजे दरे (ता. महाबळेश्वर) येथे साकारण्यात आलेल्या बांबू मूल्यवर्धन केंद्र आणि टसर रेशीम शाश्वत रोजगार व वनसंवर्धन प्रकल्पाचे लोकार्पण, तसेच मौजे मुनावळे (ता. जावळी) येथील महत्त्वाकांक्षी जलपर्यटन प्रकल्प आणि पाटण तालुक्यातील दरडग्रस्त कुटुंबांच्या कायमस्वरूपी पुनर्वसन प्रकल्पाचे भूमिपूजन शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पर्यायी पूरक कृषी रोजगार मिळवून देणाऱ्या, तसेच पर्यटनवाढीला चालना देणाऱ्या आणि दरडग्रस्त कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणाऱ्या या प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत 9 मार्च रोजी मौजे दरे, मौजे मुनावळे (ता. जावळी), मौजे धावडे (ता. पाटण) येथे होणार असल्याची माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
Edited By : Umesh Bambare
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.