Nilesh Rane And Vaibhav Naik  sarkarnama
कोकण

Vaibhav Naik Vs Nilesh Rane : बिडवलकर हत्या प्रकरण : 'आता मी मैदानात, त्यांना जेलची वारी...'; निलेश राणेंचा वैभव नाईकांना इशारा

Bidwalkar Murder case : सिंधुदुर्गमधील प्रकाश बिडवलकर हत्या प्रकरण दोन वर्षानंतर आता उजेडात आलं असून एकच खळबळ घडाली आहे. या प्रकरणावरून ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी राणे कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत.

Aslam Shanedivan

Sindhudurg News : राज्यात बीडमधील सरपंच हत्या प्रकरणाचे पडसाद अद्याप शांत झालेले नाहीत. तोच पुन्हा एकदा सिंधुदुर्गमधील चेंदवन येथील प्रकाश बिडवलकर हत्या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी याप्रकरणावरून थेट राणे कुटुंबावरच निशाना साधत गंभीर आरोप केले होते.

यावरून वाद पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती. तर आता या आरोपावरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर देताना, माझे आरोपी सिद्धेश शिरसाट यांच्याशी संबंध नाहीत. त्याच्याबरोबर एकही फोटो नाही म्हणणाऱ्या वैभव नाईकांना आरसाच दाखवला आहे. पत्रकार परिषदेत निलेश राणेंनी सिद्धेश शिरसाट आणि वैभव नाईकांचा फोटो दाखवत सीडीआर तपासण्याची मागणी केली आहे.

वैभव नाईक यांनी या प्रकरणातील आरोपी सिद्धेश शिरसाट याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि निलेश राणेंनी संबंध असल्याचा दावा केला होता. तसेच त्यांच्याबरोबर असणारे फोटो समाजमाध्यमांवर टाकत येथील आका कोण असा सवाल केला होता. ज्यानंतर आता हे प्रकरण राजकीय सुडाचे मैदान झाले आहे. या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जातायतं.

आता निलेश राणे यांनी वैभव नाईक यांच्या आरोपांचा समाचार घेताना, बिडवलकर यांचा जो व्हिडिओ समाज माध्यमावर गेला आहे. त्याची फॉरेन्सिक तपासणी करण्यात यावी, 2009 पासून आतापर्यंतचे सिद्धेश शिरसाट आणि वैभव नाईक यांच्यासह जवळच्या सहकारी आणि नातेवाईकांसह आमचेही सीडीआप तपासण्याची मागणी केली आहे. तर या सगळ्यांच्या आधी वैभव नाईक यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही राणेंनी केली आहे.

हे प्रकरण दोन वर्षांपूर्वी असून त्याबाबत फाईलवरून वैभव नाईक यांनी आरोप केले आहेत. याबाबत त्यांनी सिद्धेश शिरसाट याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझ्यासोबत असणारे फोटो व्हायरल केले आहेत. यात राजकारण आणण्याची प्रयत्न नाईक यांनी केला आहे. बिडवलकर यांच्याही नातेवाईकांनी दोन वर्षानंतर आता तक्रार केलीय. पण मध्यंतरी जर याची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती असे जर वैभव नाईक आता म्हणत असतील तर ते तेंव्हा गप्प का होते. त्यावेळी तर ते आमदार होते. मग तेव्हा आवाज का उठवला नाही, असाही सवाल निलेश राणे यांनी आता उपस्थित केला आहे.

त्याचबरोबर नाईक यांनी समाजमाध्यमावर टाकलेल्या व्हिडिओवर अक्षेप घेताना, जर हा व्हिडिओ त्यांच्याकडे होता तर तो पेलिसांना का दिला नाही, असेही त्यांनी विचारणा केली आहे. तर त्यांच्यावर आमदार असताना कोणाचा दबाव होता असे म्हणत आता आपण या प्रकरणात उतरणार असून वैभव नाईक यांची चौकशी लावणार आहोत. आता त्यांची यातून सुटका होणार नसून त्यांना जेलमध्ये जावं लागेल, असाही दावा निलेश राणेंनी केला आहे.

तसेच निलेश राणेंनी यावेळी, आपण याप्रकरणात पोलिस अधीक्षकांना आपण चौकशी करण्याची विनंती करणार असल्याचे सांगितले आहे. तर या प्रकरणात फॉरेन्सिक तपासणी करण्यासह यात जर कोणी आमचा असेल तरी कारवाई करा, कोणालाही सोडू नका. मग तो कोणताही राजकारणी असो असे म्हटलं आहे.

बॅनर लावले म्हणजे...

यावेळी राणेंनी नाईक यांनी दाखवलेल्या फोटोंचा समार घेताना लोकप्रतिनिधी म्हटलं की, त्याला भेटणारे, त्याचे बॅनर लावणारे अनेक असतात. पण फक्त बॅनर लावले, त्याच्याबरोबर फोटो आले म्हणजे याचा अर्थ आरोपीशी संबंध असतात असे होत नाही.

आतातर वैभव नाईक आणि या प्रकरणातील दोन नंबरचा आरोपी यांचे फोटो नाचतानाचे आहेत. पण त्यांना 10 वर्षात कधी आमदारकी कळलीच नाही. ते फक्त दारू, ड्रग्ज, अनैतिक व्यवसाय वाल्यांकडून पैसै घेत होते. पण आता असे धंदेच येथे चालू देणार असाही इशारा त्यांनी दिला आहे.

तसेच सिद्धेश शिरसाट हा शिवसेना उद्धव ठाकर गटाचा पदाधिकारी नव्हताच हे खरं आहे. पण तो नाही तर त्याची पत्नी उबाठाची पदाधिकारी होती. सातच महिन्यांपूर्वी तिने राजीनामा दिला आहे. पण फक्त सोबत फोटो आणि बॅनर लागल्याने कोणी पदाधिकारी होत नसतो असाही टोला निलेश राणेंनी वैभव नाईक यांना लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT