Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्याप्रकरणी धक्कादायक बाब समोर; परीक्षण अहवालात आढळला चार हत्याराचा वापर अन् इतक्या जखमा..

Shocking revelations in Santosh Deshmukh case News: सुनावणीवेळी या संपूर्ण बाबींचा रिपोर्ट आता न्यायालयामध्ये सादर करण्यात आला आहे. या तपास यंत्रणेने या सर्व बाबी न्यायालयासमोर मांडल्या आहेत.
Santosh Deshmukh Murder Case
Santosh Deshmukh Murder CaseSarkarnama
Published on
Updated on

Beed News : केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर दररोज या प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. या हत्या प्रकरणाची सुनावणी कोर्टात सुरु आहे. सुनावणीवेळी या संपूर्ण बाबींचा रिपोर्ट आता न्यायालयामध्ये सादर करण्यात आला आहे. या तपास यंत्रणेने या सर्व बाबी न्यायालयासमोर मांडलया आहेत. त्यामध्ये या प्रकरणातील परीक्षण अहवालात धक्कादायक बाब समोर आली असून आरोपींनी संतोष देशमुख यांना मारहाण करताना अहवलात चार हत्याराचा वापर करण्यात आला , तर संतोष देशमुख यांच्या शरीरावर 150 जखमा आढळून आल्या आहेत.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे आरोपीने 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करून त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आले होते. आरोपींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी राज्यात काही ठिकाणी मोर्चे काढण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटले होते. या प्रकरण पोलिसांनी नऊ आरोपीना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर मोक्कातंर्गत कारवाई सुरु केली आहे.

Santosh Deshmukh Murder Case
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना रायगडावर मानाचे पान; शेवटच्या क्षणी दिली भाषणाची संधी तर अजितदादांना मात्र...

आरोपीने अपहरण केल्यानंतर संतोष देशमुख यांना बेदम मारहाण करताना त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंगही केले होते. आरोपींनी संतोष देशमुख यांना गॅसचा पाईप, गाडीच्या वायरच्या चाबकाने, लाकडी बांबूची काठी आणि लोखंडी पाईप अशा चार हत्यारांचा मारहाणीसाठी वापर केल्याचे परीक्षण अहवालात समोर आले आहे. या चार विशेष हत्यारांनी संतोष देशमुख यांना बेदम मारहाण झाली असे या अहवालामध्ये नमूद केलेले आहे. चारीही विशेष हत्यारही या गॅंगने तयार केल्याचा अहवालात उल्लेख आहे.

Santosh Deshmukh Murder Case
BJP Maharashtra : भाजपमध्ये जबरदस्त कोल्ड वॉर! मुनगंटीवारांना पुन्हा जड जातोय त्यांचाच पठ्ठ्या, सुरू झाला वादाचा नवा अंक

सरपंच संतोष देशमुख यांच्या शरीरावरती 150 जखमा आढळल्या होत्या. आरोपींनी या आधी देखील इतर व्यक्तींना याच हत्यारांनी मारहाण केली, असेही उघड झालं आहे. या हत्यारांनी जर मारहाण झाली तर मृत्यू होऊ शकतो असेही या अहवालामध्ये म्हटले आहे. या हत्यारांचा परीक्षण अहवाल या सर्व प्रकरणांमध्ये महत्त्वाचा ठरणार आहे.

Santosh Deshmukh Murder Case
Sudhir Mungantiwar Funny Speech : '...तर अर्ध्या आमदारांच्या बायका या हिरोईनी असत्या', सुधीर मुनगंटीवारांनी सांगितला 'तो' किस्सा

या चार हत्याराने एखाद्याला मारहाण करण्यात आली तर या घटनेमध्ये त्याचा मृत्यू होऊ शकतो, असेही या अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. याच हत्याराने देशमुख यांना मारहाण झालेली होती. या मारहाणीमध्ये जवळपास 150 हून अधिक जखमा संतोष देशमुख यांच्या अंगावरती आढळून आला होत्या. या संपूर्ण बाबींचा रिपोर्ट आता न्यायालयामध्ये सादर करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या यंत्रणेने या सर्व बाबी न्यायालयासमोर मांडल्या आहेत. त्यामुळे आता या प्रकरणी कोर्टात होत असलेल्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Santosh Deshmukh Murder Case
Pune Congress : कोल्हापूरचा पैलवान पुण्यात डाव टाकणार ! काँग्रेस शहराध्यक्षांसह संघटनात्मक मोठे बदल होणार ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com