महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात शिंदे गटाच्या शिवसेनेत मोठी उलथापालथ झाली आहे.
उरण विधानसभा जिल्हाप्रमुख अतुल भगत यांना पदावरून हटवल्यानंतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले.
या घटनेमुळे रायगड जिल्ह्यात शिंदे सेनेला मोठा राजकीय धक्का बसला असून खळबळ उडाली आहे.
Raigad News : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकांची रणधुमाळी सुरु असतानाच फोडाफोडीच्या राजकारणाला उत आला आहे. यात रायगड जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. उरण विधानसभा जिल्हाप्रमुख अतुल भगत यांना पदावरून हटवल्याने अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे देत संताप व्यक्त केला आहे.
शिवसेनेने उरण विधानसभा जिल्हाप्रमुख अतुल भगत यांना हटवून नुकतेच विनोद साबळे यांना नियुक्त केले. त्यानंतर पदाधिकाऱ्यांमध्ये शिवसेनेत नाराजीचा स्फोट झाला आहे. येथे उरण तालुका प्रमुख दीपक ठाकूर, पनवेल तालुका प्रमुख रघुनाथ पाटील यांच्यासह तब्बल 33 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत.
नुकतीच उरण नगरपरिषदेची निवडणूक पार पडली असून जिल्ह्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची प्रतिक्षा राजकीय पक्षांना लागली आहे. त्यासाठी जोरदार तयारी केली जात आहे. अशातच येथे झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. उरण नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी शिवसेनेने भाजपशी युती न करता स्वतंत्र उमेदवार उभे करून निवडणूक लढविली होती.
त्यावेळी प्रचारात एकमेकांनी जोरदार टीका टिप्पणी केली होती. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर युतीमध्ये तणाव निर्माण झाला होता. याबाबत भाजप श्रेष्ठींनी शिवसेनेच्या वरिष्ठांकडे तक्रार केल्याचे सांगितले जात आहे. अशातच अतुल भगत यांना पदावरून हटवण्यात आले होते. ज्यामुळे शिवसेनेतील पक्षातंर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. पक्षवाढीसाठी मेहनत घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांना डावलून बाहेरून आलेल्यांना नियुक्ती केल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
याचबरोबर या पदाधिकाऱ्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर मनमानी आणि एकाधिकारशाही केल्याचा आरोप देखील केला आहे. थोरवे यांनीच विनोद साबळे यांची प्रभारी जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली होती. यावेळी थोरवे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांची बाजू ऐकून घेतली नाही. उलट परस्पर नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर इथल्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी उमटली होती.
एकीकडे एकनाथ शिंदे यांनी विविध जिल्ह्यांमधील इतर पक्षीय नेत्यांचा पक्षप्रवेशाचा धडाका लावला असतानाच दुसरीकडे पक्षातील पदाधिकारी नाराज होताना दिसत आहे. फक्त नाराजच नाही तर राजीनामा देत आहेत. यामुळे ऐन निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नाराजीनाट्य उफाळून आल्याचे सध्याचे चित्र आहे. तर या राजकीय घडामोडीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचा फटका पक्षाला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान तळकोकणातील सिंधुदुर्गात जिल्ह्यात देखील नगरपालिका निवडणूका पार पडताच वेंगुर्ल्यात शिवसेनेत तडकाफडकी राजीनामे पडले होते. वेंगुर्ले तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, महिला तालुकाप्रमुख दिशा शेटकर, उपजिल्हाप्रमुख सुहास कोळसुलकर यांचे आपल्या पदाचे राजीनामे होते. या तिघांनी पक्षाला पुरेशा वेळ देऊ शकत नसल्याचे कारण देत दिले राजीनामे दिले होते. मात्र यामागे वेगळेच कारण असल्याची तेथे चर्चा रंगली होती.
1. रायगडमध्ये शिंदे सेनेत नेमकं काय घडलं?
➡️ उरण विधानसभा जिल्हाप्रमुख अतुल भगत यांना पदावरून हटवल्यानंतर कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले.
2. अतुल भगत कोणत्या पदावर होते?
➡️ ते उरण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना जिल्हाप्रमुख होते.
3. या घटनेमुळे कोणत्या पक्षाला धक्का बसला?
➡️ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला.
4. हा वाद कोणत्या निवडणुकीच्या काळात घडला?
➡️ राज्यातील महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत.
5. या घटनेचा पुढील राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो?
➡️ रायगड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.