Shivsena Politics in zilla parishad panchayat samiti election; eknath shinde sarkarnama
कोकण

Shivsena Politics : शिवसेनेच्या बड्या नेत्याला तटकरेंशी जवळीक भोवली; एकनाथ शिंदेंकडून थेट पक्षातून हकालपट्टीची कारवाई

Eknath Shinde Shivsena : जिल्हा परिषद निवडणुकीनंतर कोकणात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत राजकीय हालचालींना वेग आला असून शिंदेंचे स्थानिक नेते अॅक्शन मोडवर आले आहेत.

Aslam Shanedivan

  1. रायगडमध्ये शिवसेना शिंदे गटाने पक्षविरोधी कारवायांवर कडक कारवाई सुरू केली आहे.

  2. रोहा तालुका कार्यकारिणी विसर्जित करण्यात आली असून मनोज शिंदे यांची हकालपट्टी झाली आहे.

  3. या निर्णयामुळे कोकणासह राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Raigad News : नुकताच जिल्ह्यासह राज्यात जिल्हा परिषद निवडणूका झाल्या असून रायगडमध्ये महायुतीची सत्ता आली आहे. पण यादरम्यान येथे मोठा राजकीय ड्रामा झाला. सत्तेत बसण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला गयावया कराव्या लागल्या. तर सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भाजपच्या खांद्यावर बंदूक ठेवत शेवटपर्यंत किल्ला लढवला. या लढाईल निवडणुकीपासून शिवसेनेच्या काही स्थानिक नेत्यांनी थेट तटकरेंना रसद पुरवल्याचे आता समोर आले आहे. तर यावरून पक्षातील अकार्यक्षम आणि पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांविरोधात पक्षाने व्यापक कारवाईला सुरूवात केली आहे. याची सुरूवात खासदार तटकरे यांच्या होमपिचवरून झाली असून शिवसेनेतील प्रमुख नेत्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

प्रदेशाध्यक्ष खासदार तटकरे यांच्या रोहा तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीत मदत करणाऱ्यांविरोधात शिवसेनेचे उत्तर रायगड जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी धडक कारवाई केली आहे. रोहा तालुक्यातील पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांनी पक्षातील अकार्यक्षम आणि पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांविरोधात पक्षाने व्यापक कारवाईला सुरूवात केल्याचे जाहीर केले.

तसेच रोहा तालुका कार्यकारिणी विसर्जित करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. तर याच बैठकीत पक्षाचे उपजिल्हा प्रमुख मनोज शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून त्याच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेण्यात आला आहे. या कारवाईनंतर कोकणासह राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आता रोहा तालुका कार्यकारिणी विसर्जित करण्यात आल्यानंतर येत्या महिन्याभरात नवीन कार्यकारीणीची निवड केली अशीही माहिती केणी यांनी दिली आहे. तर हा निर्णय नगर पालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीनंतर समोर आलेल्या स्थितीनंतर घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान या कारवाई मागे नेमकं कारण काय अशी चर्चा सुरू झाली आहे. तर रोहा नगर पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची भाजपसोबत युती झाली होती. मात्र येथे शिवसेनेला म्हणावे तसे यश आले नाही. तर पक्षाच्या उमेदवारांना मदत न करता पक्षातील अनेकांनी विरोधकांशी संधान बांधले. याचीच पुनरावृत्ती जिल्हा परिषद निवडणुकीतही झाली.

तर उपजिल्हाप्रमुख पदावर कार्यरत असलेले मनोज शिंदे नगरपालिका निवडणुकीपासूनच तटकरेंच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. यावरूनच आता केणी यांनी संपुर्ण तालुका कार्यकारीणीच विसर्जित करत शिंदे यांच्यासह इतरांना दणका दिला आहे. तसेच पक्षात गद्दारी खपवून घेतली जाणार नाही, अशांची पक्षातून हकालपट्टी केली जाईल असाच इशारा दिला आहे. या निर्णयामुळे रोहा परिसरात खळबळ उडाली राजकीय वर्तूळात चर्चांना उधाण आले आहे.

FAQs :

1. रायगडमध्ये कोणती कारवाई करण्यात आली?
रोहा तालुका कार्यकारिणी विसर्जित करण्यात आली आणि मनोज शिंदे यांची हकालपट्टी झाली.

2. ही कारवाई कोणी जाहीर केली?
राजा केणी यांनी बैठक घेऊन हा निर्णय जाहीर केला.

3. मनोज शिंदे यांच्यावर कारवाई का झाली?
पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

4. या कारवाईचा परिणाम काय होईल?
पक्षात शिस्त वाढेल आणि राजकीय समीकरणांमध्ये बदल होऊ शकतो.

5. या घटनेमुळे कोणत्या भागात खळबळ उडाली?
कोकणासह संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT