Shivsena Politics : परभणी महापालिकेने 9 वर्षांपूर्वीच्या अर्जावर पहाटे 3 वाजता हनुमान मंदिर हटवलं; शिवसैनिकांचा 'मुस्लीम महापौर' म्हणत निशाणा

Parbhani Municipal Corporation : परभणी महापालिकेत मुस्लिम महापौर बसताच पहाटे तीन वाजता महापालिकेने कारवाई केल्याने शहरातील वातवारण तापले आहे.
Parbhani Municipal Corporation
Parbhani Municipal Corporationsarkarnama
Published on
Updated on
Summary
  • परभणीत हनुमान मंदिर हटवल्यामुळे शहरातील वातावरण तापले आहे.

  • शिवसैनिकांनी महापालिकेवर धडक देत आंदोलन केले, पोलीसांशी झटापट झाली.

  • काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले असून प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

Parbhani News : परभणी महापालिकेत काही दिवसांपूर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसची सत्ता स्थापन झाली. महापौरपदी इक्बाल सय्यद यांची निवड झाली. पण तेव्हापासूनच शहरातील वातवारण तापले होते. आता तब्बल 9 वर्षांपूर्वीच्या एका अर्जावर हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले वांगी रोडवरील अपना नगर भागातील हनुमान मंदिर हटवण्यात आले. भल्या पहाटे तीन वाजता महापालिकेने ही कारवाई केल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी आज थेट महापालिकेवर धडक देत टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांशी झटापट झाली, काही शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान एक मुस्लिम महापौर पदावर बसताच महाविकास आघाडीने रंग दाखवायला सुरूवात केल्याचा आरोप होत आहे. पण हे मंदिर हटवण्यासाठी एका व्यक्तीने नऊ वर्षांच्या आधी महापालिकेकडे अर्ज दिल्याचे समोर येत आहे.

नऊ वर्षानंतर झालेल्या या कारवाईनंतर आता गंभीर प्रश्न विचारले जात असून शिवसेनेने त्यावर बोट ठेवले आहे. तर इतकी वर्ष त्यावर कारवाई झाली नाही, मग महापालिकेत मुस्लिम महापौर बसताच पहाटे 3 वाजता महापालिकेने ही कारवाई कशी काय केली? महापौर आणि आयुक्तांनी मिळून हनुमान मंदिर पाडले. मूर्ती कचऱ्याच्या ट्रॅक्टरमधून नेत तिची विटंबना केली, असा आरोप आनंद भरोसे यांनी केला आहे. जोपर्यंत महापालिका प्रशासन व महापौर हनुमानाची मुर्ती आणि मंदिर आहे त्याच ठिकाणी होते तसेच उभारत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा शिवसैनिकांनी दिला.

Parbhani Municipal Corporation
Shivsena UBT Politics : राजकीय वर्तुळात खळबळ! उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराला पोलिसांची नोटिस; नेमकं कारण काय?

यावेळी संतप्त शिवसैनिकांनी महापालिकेच्या इमारतीत घुसून आयुक्त, महापौरांच्या दालनाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. पोलीसांनी शिवसैनिकांची धरपकड केली. आनंद भरोसे यांच्यासह शिवैसनिकांची पोलीसांशी झटापटही झाली. महापालिकेत मुस्लिम महापौर पदावर बसताच त्याने रंग दाखवायला सुरूवात केली, आम्ही हे कदापी सहन करणार नाही, असा आक्रमक पावित्रा शिवसेनेने घेतल्याने वातावरण चिघळले होते.

परभणी महापालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस पक्षाची आघाडी आहे. सर्वाधिक 25 जांगासह शिवसेना (उबाठा) हा सर्वात मोठा पक्ष ठरला. तर काँग्रेस पक्षाचे बारा नगरसेवक निवडून आले आहेत. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने इकबाल सय्यद यांना महापौर पदाची उमेदवारी देत त्यांना खुर्चीवर बसवले. यानंतर ठाकरेंच्या पक्षावर राज्यभरातून टीकेची झोड उठवली गेली. आता मुस्लिम महापौर पदावर बसताच हिंदूची मंदिरे पाडली जात असल्याचा आरोप शिंदेच्या शिवसेनेने महापौरांवर केला आहे.

मी आदेश दिलाच नाही...

दरम्यान, हनुमान मंदिर हटवल्याच्या प्रकरणावरून टीकेचे लक्ष्य होत असलेले महापौर इकबाल सय्यद यांनी मात्र शिवसेनेचे आरोप फेटाळून लावले. मंदिर हटवण्याचा कुठलाही आदेश आपण दिला नाही. मी फेब्रुवारी महिन्यात महापौर पदाचा पदभार स्वीकारला. तर मंदिर हटवण्या संदर्भातील आदेश हे त्याआधीचे आहेत, असा दावा महापौरांनी केला आहे. हा आदेश कोणी व आताच का दिला? याची चौकशी करण्याचे आदेश आपण दिल्याचेही इकबाल सय्यद यांनी स्पष्ट केले.

Parbhani Municipal Corporation
shivsena Politics : शिंदेंच्या शिलेदाराचा तडकाफडकी राजीनामा, केसरकरांची मनधरणी फसली; 'राजीनामा बॉम्ब'ने शिवसेनेत खळबळ

FAQs :

1. परभणीत वाद कशामुळे निर्माण झाला?
हनुमान मंदिर हटवण्याच्या कारवाईमुळे वाद निर्माण झाला.

2. ही कारवाई कधी करण्यात आली?
पहाटे सुमारे ३ वाजता महापालिकेने कारवाई केली.

3. कोणत्या पक्षाने आंदोलन केले?
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

4. पोलीसांनी काय कारवाई केली?
झटापटीनंतर काही शिवसैनिकांना ताब्यात घेतले.

5. पुढे काय होऊ शकते?
या प्रकरणावरून राजकीय तणाव वाढण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com