CM Eknath Shinde News  Sarkarnama
कोकण

Eknath Shinde News : मुख्यमंत्री शिंदेंकडून उद्धव ठाकरे पुन्हा टार्गेट; उंटावरून शेळ्या हाकणारा...

Shiv Sena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाकरे गटावर जोरदार टीका

सरकारनामा ब्युरो

Ratnagiri: शिवसंकल्प यात्रेच्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यात होते. खेड आणि पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या सभेत त्यांनी उद्धव ठाकरेंवर वार करण्याची एकही संधी सोडली नाही. आज (सोमवारी) मुख्यमंत्री शिंदे कोकण दौऱ्यावर आहेत. मात्र, या दौऱ्यातदेखील ठाकरेच मुख्यमंत्र्यांच्या टार्गेटवर होते.

आपण फिल्डवर काम करणारा मुख्यमंत्री आहे. घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारा मुख्यमंत्री नाही. त्यामुळे प्रत्यक्ष जातो आणि काम सुरू करतो, असा टोला शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. राजापूर येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मंत्री दीपक केसरकर, मंत्री उदय सामंत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित हते.

आपण स्वच्छता अभियान सुरू केले आहे. केवळ मुंबई नाही, तर अख्खा महाराष्ट्र स्वच्छ सुंदर करू आणि विकासाच्या आड येतील त्यांची सफाई करू. निवडणुकीच्यानिमित्ताने खोट्याच्या कपाळी गोटा, ही म्हण कोकणी माणूस खरी करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. कारण या ठिकाणी विझलेल्या मशालींचा उजेड पडत नाही. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, असा टोमणादेखील मुख्यमंत्र्यांनी ठाकरे गटाला लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या कोकणाने कोकणी माणसाने शिवसेनेवर बाळासाहेबांवर जीवापाड प्रेम केलं. या कोकणी माणसाची नाळ ही बाळासाहेबांच्या विचारांशी जोडलेली आहे. विचारांशी बांधिलकी आहे ती या धनुष्यबाणाबरोबर. हा शिवसैनिक हिंदुत्ववादीविरोधी शक्तींचा आणि विघ्नसंतोषी लोकांचा नायनाट केल्याशिवाय राहणार नाही, असेदेखील मुख्यमंत्री म्हणाले.

बाळासाहेब नको पैसे हवेत...

शिवसेना अधिकृतपणे आपल्याला मिळाली तेव्हा पक्षाच्या खात्यात 50 कोटी होते. ते पैसे परत मागितले. खरं तर ती मागणी योग्य नव्हती. यांना बाळासाहेब नकोत. बाळासाहेबांचे विचार नकोत, बाळासाहेबांची भूमिका नको, शिवसैनिकांची भूमिका नको यांना फक्त पैसे पाहिजेत. पण एका मिनिटात या एकनाथ शिंदेने सांगितलं, की देऊन टाका पैसे आणि ते पन्नास कोटी रुपये त्यांना दिले, असे सांगत शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

(Edited By Roshan More)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT